कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:05 PM2018-04-28T14:05:25+5:302018-04-28T14:05:25+5:30

कोट्यावधी रुपये खर्चून संभाजीनगर येथे बांधण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्यावतीने मंगळवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे.

Kolhapur: Meteorological fasting by the Nationalist Congress Party on Tuesday | कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी लाक्षणिक उपोषण

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी लाक्षणिक उपोषणविभागीय क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

कोल्हापूर : कोट्यावधी रुपये खर्चून संभाजीनगर येथे बांधण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्यावतीने मंगळवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे.

कोल्हापूरात प्रथमच विभागीय क्रीडा संकुल होणार म्हणून गेल्या नऊ वर्षापूर्वी क्रीडा प्रेमींमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, यात कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या संकुलात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर फुटबॉल मैदान, बास्केटबॉल मैदान, ४०० मीटरचा ट्रॅक, जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, खो-खो अशा विविध कामे दर्जाहीन झाली आहेत. त्यामुळे यातील दोषींवर कडक कारवाई करावी.

या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ८ ते १२ या दरम्यान चार तासांचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. तरी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून आंदोलनास पाठींबा द्यावा. असे आवाहन क्रीडा सेल तर्फे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

 

Web Title: Kolhapur: Meteorological fasting by the Nationalist Congress Party on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.