कोल्हापूर सैन्य भरती : लेखी परीक्षेसाठी सुमारे तीन हजार उमेदवार पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:47 PM2018-12-18T17:47:50+5:302018-12-18T17:50:36+5:30
सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी तीन हजार उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती सैन्यदलातील भरती विभागाचे कोल्हापुरातील संचालक कर्नल अनुराग सक्सेना यांनी मंगळवारी दिली.
कोल्हापूर : भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी कोल्हापूरमध्ये सैन्य दलातर्फे आयोजित धावणे आणि शारिरीक चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेतून सुमारे तीन हजार उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती सैन्यदलातील भरती विभागाचे कोल्हापुरातील संचालक कर्नल अनुराग सक्सेना यांनी मंगळवारी दिली.
भारतीय सैन्यदलातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर भरती प्रक्रिया दि. ६ डिसेंबरपासून सुरू झाली. या प्रक्रियेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा आणि उत्तर आणि दक्षिण गोवा येथील उमेदवारांनी नोंदणी केली. त्यांनी आतापर्यंत धावण्याची आणि मैदानी चाचणी दिली.
या चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यातून सुमारे तीन हजार उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.