कोल्हापूर : गाय घेऊन जाणारा मिनी टेम्पो पकडला, तिघांवर गुन्हा : सीपीआर चौकात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:55 AM2018-09-07T11:55:27+5:302018-09-07T11:57:30+5:30
बेकायदेशीररीत्या देशी गाय घेऊन जाणारा मिनी टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ५) रात्री सीपीआर चौकात पकडला.
कोल्हापूर : बेकायदेशीररीत्या देशी गाय घेऊन जाणारा मिनी टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सीपीआर चौकात पकडला.
या प्रकरणी संशयित सचिन बाळासाहेब पोवार (रा. पंचगंगा तालीमजवळ, कोल्हापूर), इमरान बेपारी (रा. सदर बाजार, कोल्हापूर) व गौतम मधुकर कांबळे (रा. १६९, निंबाळकर माळ, सदर बाजार) यांच्यावर गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी ऊर्फ बंडोपंत माधवराव साळुंखे (रा. धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर) यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री संभाजी साळुंखे हे सीपीआर चौकात मित्रांसमवेत थांबले होते. त्यावेळी संशयित टेम्पोचालक गौतम कांबळे हा टेम्पोतून गाय घेऊन जात होता. साळुंखे व त्यांचे मित्र शहरप्रमुख महेश उरसाल, सचिन मांगोरे, दिलीप भिवटे, संतोष निकम, आदींनी मिनी टेम्पोची तपासणी केली. त्यात देशी गाय आढळून आली.
या गाईबाबत टेम्पोचालका कांबळेला विचारले असता सचिन पोवार हा इमरान बेपारीला गाय विक्री करण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. हा प्रकार कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना कळविला. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले.
त्यांनी याप्रकरणी तिघांवर प्राणी संरक्षण व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेतलेली गाय ही संरक्षण व संगोपनासाठी खिल्लारे गो-शाळा, निमशिरगाव येथे पोहोचविण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक तिप्पे करीत आहेत.