कोल्हापूरच्या आमदारांचा विधिमंडळाबाहेर आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:50 AM2018-11-20T00:50:26+5:302018-11-20T00:50:31+5:30
कोल्हापूर : मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी विधानभवन (मुंबई) येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शिवसेनेच्या ...
कोल्हापूर : मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी विधानभवन (मुंबई) येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाबाहेर आवाज घुमविला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षण त्वरित मिळावे, असे फलक गळ्यात अडकविलेले शिवसेनेचे आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर यांनी जोरदार घोषणाबाजी करीत विधानभवनात प्रवेश केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता राज्यभरात ५९ हून अधिक मूक व नंतर ठोक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना करून स्वयंस्पष्ट अहवाल करण्याची विनंती केली. यानुसार आयोगाने याबाबतचा अहवाल १५ नोव्हेंबरला मुख्य सचिवांकडे सादर केला. यावर राज्य सरकारने हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवून स्वतंत्र ‘एसईबीसी’ प्रवर्गातून आरक्षण जाहीर केले आहे. हे आरक्षण राज्यात लवकरात लवकर लागू करून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी यावेळी या सर्व आमदारांनी या अधिवेशनावेळी केली.