कोल्हापूर : म.न.पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, उषाराजे हायस्कूलची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:16 PM2018-10-06T14:16:00+5:302018-10-06T14:20:37+5:30
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील म. न. पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा, तर मुलींमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाचा उषाराजे हायस्कूलने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील म. न. पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा, तर मुलींमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाचा उषाराजे हायस्कूलने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यांत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा ३-० असा पराभव केला. महाराष्ट्रकडून दर्शन पाटीलने दोन, शाहीद महालकरीने एक गोलची नोंद केली. तत्पूर्वी महाराष्ट्र हायस्कूलने स. म. लोहिया हायस्कूलचा ४-० असा, तर शाहू विद्यालयाने माईसाहेब बावडेकर स्कूलचा सडनडेथवर पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या म. न. पा. स्तर फुटबॉल स्पर्धेत विजयी झालेल्या उषाराजे हायस्कूलच्या संघासोबत मान्यवर उपस्थित होते.
१४ वर्षांखालील मुलींमध्ये उषाराजे हायस्कूलने शाहू विद्यालयाचा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत उषाराजे हायस्कूलने भाई माधवराव बागल हायस्कूल, तर शाहू विद्यालयाने पोदार इंटरनॅशनल स्कूलचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
विजेत्या संघाला उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राजेंद्र दळवी, नितीन जाधव, राजू साळोखे, सुरेश पिसाळ, प्रदीप साळोखे, सचिन पांडव आदी उपस्थित होते.