कोल्हापूर : महिन्याभरासाठी ‘मध्यम मुदत’, व्यक्तीगत कर्जपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:18 AM2018-06-09T11:18:48+5:302018-06-09T11:18:48+5:30
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ‘व्यक्तीगत’, ‘मध्यममुदत’ सह इतर कर्जपुरवठा महिन्याभरासाठी थांबवला आहे. गेले दीड-दोन महिने विविध आकर्षक कर्ज योजना जाहीर केल्या पण कर्जपुरवठा बंद केल्याने ऐन हंगामात ग्राहकांची गोची झाली आहे.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ‘व्यक्तीगत’, ‘मध्यममुदत’ सह इतर कर्जपुरवठा महिन्याभरासाठी थांबवला आहे. गेले दीड-दोन महिने विविध आकर्षक कर्ज योजना जाहीर केल्या पण कर्जपुरवठा बंद केल्याने ऐन हंगामात ग्राहकांची गोची झाली आहे.
जिल्हा बॅँकेने ठेवी बरोबर कर्ज वाटप वाढविण्यासाठी एक विशेष आराखडा तयार केला आहे. ग्राहकांसाठी आकर्षक व्याज दराच्या ठेव योजना आणल्या आहेत, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्ज वितरण अधिकाधिक होण्यासाठी जिल्हा बॅँकेने आकर्षक कर्ज योजना आणल्या आहेत.
जास्तीत जास्त ग्राहक जोडला जाऊन बॅँकेचा व्यवसाय वृध्दींगत करण्याचा प्रयत्न आहे. ‘आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत तरूणांना रोजगारासाठी १२ टक्के व्याज दराने दहा लाखापर्यंत कर्जपुरवठा दिला जाणार आहे. खडकी कोंबड्यांसाठी पाच वर्षे मुदतीने बचत गटांसाठी कर्ज योजना सुरू केली आहे. तृतीयपंथीसाठीही कर्ज देण्याचा निर्णय बॅँकेने अलिकडेच घेतला आहे.
एकीकडे नवनवीन कर्ज योजना जाहीर केल्या असताना १ जून पासून कर्जपुरवठा थांबविला आहे. मध्यम मुदत, सोनेतारण, बचत गटांना कर्जपुरवठा महिन्याभरासाठी बंद केल्याचे विकास संस्थांना कळविले आहे.
सध्या लग्नसराई, घर दुरूस्तीसह इतर कारणासाठी शेतकऱ्यांना मध्यममुदत कर्जाची गरज असते. विकास संस्थांच्या माध्यमातून हे कर्ज मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या गरजा भागल्या जातात. पण बॅँकेने कर्ज वसुलीचे कारण पुढे करत हा कर्जपुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे.
‘सीडी’ रेशोसाठी कर्जपुरवठा बंद
रिझर्व्ह बॅँकेच्या नियमानुसार ठेवी व कर्जाचे प्रमाण (सीडी रेशो) बॅँकांना राखावे लागते. एकूण ठेवीच्या ७० टक्केच कर्जवाटप करावे लागते. हा बॅलेन्स राखण्यासाठीच कर्ज
बॅँकेचे सर्व कर्मचारी वसुलीत अडकले आहेत. त्यामुळे कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष होत असेल पण कोणत्याही प्रकारचा कर्जपुरवठा बंद केलेला नाही.
- डॉ. ए. बी. माने,
प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक