कोल्हापूर : दिवाळीसाठी एस.टी.च्या ३०० जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:13 PM2018-10-31T12:13:04+5:302018-10-31T12:14:27+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त ३०० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये पुण्यासाठी ...

Kolhapur: More than 300 additional ST trains for Diwali | कोल्हापूर : दिवाळीसाठी एस.टी.च्या ३०० जादा गाड्या

कोल्हापूर : दिवाळीसाठी एस.टी.च्या ३०० जादा गाड्या

googlenewsNext
ठळक मुद्देदिवाळीसाठी एस.टी.च्या ३०० जादा गाड्यामुंबई, पणजी, बेळगाव, कोकण, सोलापूर या मार्गांवरही फेऱ्या

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त ३०० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये पुण्यासाठी नियमित बसेसव्यतिरिक्त २५५ जादा बसेसचे नियोजन केले आहे.

दिवाळी सणानिमित्त विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दि. २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे-कोल्हापूर या मार्गावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, या कालावधीत नियमित बसेसव्यतिरिक्त २५५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच विभागामधील सर्व आगार व्यवस्थापक यांना सदर कालावधीत प्रवाशांसाठी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरून विविध मार्गांवर जादा बसगाड्या सोडण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

यासह मुंबई, पणजी, बेळगाव, कोकण, सोलापूर या मार्गांवरही जादा फेऱ्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तरी सदर बसेसच्या अधिक माहितीकरिता कोल्हापूर बसस्थानक येथे संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Kolhapur: More than 300 additional ST trains for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.