कोल्हापूर : अपघातामध्ये आईचा मृत्यू, समर्थ झाला आईविना पोरका ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:01 PM2018-04-13T12:01:49+5:302018-04-13T12:03:02+5:30
कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गावर रेडेडोह येथे गुरुवारी झालेल्या व्हॅन अपघातामध्ये परभणी जिल्ह्यातील सुरेखा गोविंदराव सातपुते (वय २५, रा. असोला) यांचा मृत्यू झाला. त्यांचा पोटचा गोळा व आठ महिन्यांचा मुलगा समर्थ मात्र, आईविना पोरका झाला... त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याने मलमपट्टी करण्यात आली होती.
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गावर रेडेडोह येथे गुरुवारी झालेल्या व्हॅन अपघातामध्ये परभणी जिल्ह्यातील सुरेखा गोविंदराव सातपुते (वय २५, रा. असोला) यांचा मृत्यू झाला. त्यांचा पोटचा गोळा व आठ महिन्यांचा मुलगा समर्थ मात्र, आईविना पोरका झाला... त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याने मलमपट्टी करण्यात आली होती.
परभणी जिल्ह्यातील तिडके, सातपुते, ढापसे या तिन्ही कुटुंबांतील, एकमेकांचे नातेवाईक असलेले गुरुवारी सकाळी जोतिबा देवदर्शनासाठी व्हॅनमधून निघाले होते. रेडेडोह येथे अपघातात सुरेखा सातपुते यांचा मृत्यू झाला; तर १३ जण जखमी झाले. ‘सीपीआर’मधील वेदगंगा इमारतीमधील महिला वॉर्डात अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात दोघेजण वाचले.
समर्थ सातपुते वेदगंगा इमारतीमध्ये गुरुवार सकाळपासून रडत होता. त्याचे नातेवाईक त्याला खांद्यावर घेऊन शांत करीत होते. समर्थचे रडू ऐकल्याने नातेवाइकांनाही काय करावे समजेना. त्याच्या आवाजामुळे ते दोन नातेवाईक स्तब्ध झाले. त्याला ते कसेबसे शांत करीत खेळवीत होते.
त्याचबरोबर अपघात विभागातील परिचारिकांनीही त्याला मायेची ऊब दिली व आपल्या खांद्यावर खेळविले. समर्थ शांत झाल्यावर त्याला त्यांनी नातेवाइकांकडे दिले. समर्थची आई अपघातात मृत झाल्याचे समजताच ‘सीपीआर’मध्ये हळहळ व्यक्त होत होती.