Govind Pansare : कळसकरसह पाच संशयीतांना पानसरे खूनप्रकरणी ताब्यात घेण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:46 PM2018-08-29T17:46:57+5:302018-08-29T17:54:49+5:30
गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास पथके आणखी माग काढण्यासाठी पुणे व बेंगलोर येथे गेली असल्याची माहिती पुढे आली आहे.
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने हाती काही धागेदोरे मिळाले आहेत. संशयीत शरद कळसकर हा कामानिमीत्त कोल्हापूरात चार वर्षे वास्तव्यास होता तसेच त्याचे कोणाशी संबध आले याचा तपास यंत्रणा शोध घेत आहे. त्यामुळे कळसकरचा कोल्हापूरशी संबध असल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यादृष्टीने कळसकरबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.