‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा आता दुसऱ्या कंपनीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:47 AM2018-11-22T00:47:03+5:302018-11-22T00:47:11+5:30
कोल्हापूर : केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने एअर डेक्कन कंपनीला सेवा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत; त्यामुळे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्याची ...
कोल्हापूर : केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने एअर डेक्कन कंपनीला सेवा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत; त्यामुळे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्याची जबाबदारी आता दुसºया कंपनीवर सोपविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्याची जबाबदारी एअर डेक्कन कंपनीला मिळाली होती. यानुसार या कंपनीने मुंबई-कोल्हापूर सेवा एप्रिल २०१८ मध्ये सुरू केली. तांत्रिक कारणामुळे अनेकदा या कंपनीकडून सेवा खंडित होत राहिली. अखेर सप्टेंबरमध्ये या कंपनीकडून या मार्गावरील सेवा बंद करण्यात आली. या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेमध्ये आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली होती. मंत्री प्रभू यांनी याबाबत केंद्रीय हवाई उडाण मंत्रालयाला कळविले होते. त्यानंतर या मंत्रालयाने आता ‘एअर डेक्कन’ ची सेवा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत; त्यामुळे ‘उडान’ योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्याबाबतची जबाबदारी दुसºया कंपनीकडे सोपविण्यात येणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘उडान’ योजनेच्या तिसºया टप्प्यातील मार्गांसाठी निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये कोल्हापूर-मुंबई, अहमदाबाद आणि गोवा मार्गांसाठी निविदा भरण्याबाबत स्पाईसजेट, इंडिगो आणि एअर एशिया या कंपन्यांना सूचित करण्यात आले आहे. या कंपन्यांकडे ‘एटीआर’ असल्याने त्यांच्यापैकी एका कंपनीला ‘कोल्हापूर-मुंबई’ पुरविण्याची जबाबदारी मिळेल. त्याची माहिती दि. १५ डिसेंबरनंतर समजणार आहे.
‘एअर डेक्कन’ची राज्यातील सेवा बंद
मुंबई : एअर डेक्कन कंपनीची महाराष्ट्रातील सेवा बंद झाली आहे. विमानतळ प्राधिकरणाने त्यांचा उडान योजनेअंतर्गत सेवा देण्याचा परवाना रद्द केला आहे. -वृत्त/८