येत्या रविवारपासून कोल्हापूर-मुंबई रोज विमानसेवा, वेळापत्रक जाणून घ्या

By पोपट केशव पवार | Published: October 10, 2023 05:46 PM2023-10-10T17:46:28+5:302023-10-10T17:47:02+5:30

व्यापारी, कलाकार, खेळाडूंसह प्रवाशांची सोय

Kolhapur-Mumbai daily flight service from next Sunday | येत्या रविवारपासून कोल्हापूर-मुंबई रोज विमानसेवा, वेळापत्रक जाणून घ्या

येत्या रविवारपासून कोल्हापूर-मुंबई रोज विमानसेवा, वेळापत्रक जाणून घ्या

कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी येत्या रविवारपासून रोज विमानसेवा सुरु होणार आहे. स्टार एअर कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात येणार असून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ लाभ होणार आहे. 
सध्या कोल्हापुरातून मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार हे चार दिवस मुंबईला विमानसेवा सुरु आहे.

कोल्हापूर व परिसरातून सध्या कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात रेल्वे, एसटी व खासगी वाहनांना लागणारा वेळ पाहता कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानसेवा सुरु व्हावी अशी मागणी उद्योजक-व्यापारी वर्गातून होत होती. या अनुषंगाने कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे.

बंगळुरु ते मुंबई व्हाया कोल्हापूर

ही विमानसेवा बंगळुरु ते मुंबई व्हाया कोल्हापूर अशी असेल. बंगळुरुहून सकाळी ९: ०५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरसाठी निघेल. १० : २० मिनिटांनी ते कोल्हापुरात पोहचेल. सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापुरातून हे विमान मुंबईसाठी उड्डाण करेल. मुंबईत ११ : ५० ला पोहचेल. मुंबईतून दुपारी ३ :४० मिनिटांनी हे विमान कोल्हापुरसाठी निघेल. कोल्हापुरात ते ४ : ४० वाजता पोहचेल. ५ : १० मिनिटांनी ते बंगळुरुसाठी रवाना होईल.

कोल्हापुर ते मुंबई ही विमानसेवा येत्या रविवारपासून रोज सुरु होणार आहे. सध्याच्या मुंबईसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या विमानसेवेमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. -अनिल शिंदे, संचालक, विमानतळ प्राधिकरण, कोल्हापुर 

Web Title: Kolhapur-Mumbai daily flight service from next Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.