कोल्हापूर-मुंबई विमान सप्टेंबरपासून
By admin | Published: April 7, 2017 01:07 AM2017-04-07T01:07:03+5:302017-04-07T01:07:03+5:30
संसद अधिवेशन; धनंजय महाडिक यांच्या प्रश्नावर गजपती यांची ग्वाही
कोल्हापूर : ‘डेक्कन चार्टर्स एव्हीएशन’ या कंपनीने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी टेंडर भरले असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये प्रत्यक्षात विमान सेवा सुरू होईल, अशी ग्वाही नागरी हवाई उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात, विमानतळांवर नाईट लँडिंग सुविधा या विषयावर झालेल्या चर्चेत कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सहभाग घेतला. खासदार महाडिक म्हणाले, डिसेंबर २०११ पासून कोल्हापूरची नागरी विमान सेवा
बंद असून, कोल्हापूर विमानतळाचा हवाई वाहतूक परवानाही रद्द झाला आहे.
ही सेवा पूर्ववत होण्यासाठी गेली दोन वर्षे आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत तसेच किमान डे आॅपरेशन सुरू व्हावे. गेल्या दोन वर्षांत या दोन्ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. मात्र, प्रत्येक बैठकीत काही तरी त्रुटी काढली जाते आणि एखादी समिती पाहणीसाठी येते, पण परिस्थिती मात्र ‘जैसे थे’च राहते. अनेक विमान कंपन्या कोल्हापूरला हवाई सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत; पण त्यासाठी आवश्यक परवाना नसल्याने, त्यामध्ये अडथळा येत
आहे.
केंद्र सरकारने रिजनल कनेक्टिव्हिटी सव्हिर्सेस अंतर्गत उडान या योजनेमध्ये कोल्हापूरचा समावेश केला आहे; पण परवानाच नसल्याने विमान सेवा सुरू होण्यास अडथळा असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.