डॉक्टरांच्या गीतगायन स्पर्धेत कोल्हापूर, मुंबईने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:46+5:302021-02-08T04:21:46+5:30

कोल्हापूर : डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धा 'प्रतिभा २०२१' चा महाअंतिम सोहळा पहिल्यांदाच कोल्हापुरात झाला. रविवारी शाहू स्मारकमध्ये रंगलेल्या या ...

Kolhapur, Mumbai won the Doctor's Singing Competition | डॉक्टरांच्या गीतगायन स्पर्धेत कोल्हापूर, मुंबईने मारली बाजी

डॉक्टरांच्या गीतगायन स्पर्धेत कोल्हापूर, मुंबईने मारली बाजी

Next

कोल्हापूर : डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धा 'प्रतिभा २०२१' चा महाअंतिम सोहळा पहिल्यांदाच कोल्हापुरात झाला. रविवारी शाहू स्मारकमध्ये रंगलेल्या या साेहळ्यात कोल्हापूर व मुंबईने बाजी मारली. कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने व कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद आणि नागपूर अशा सहा विभागांतील २९ स्पर्धकांनी उपशास्त्रीय, सुगम संगीत आणि द्वंद्वगीत या तीन गटांत सहभाग घेतला.

डॉक्टरांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘प्रतिभा’ या नावाने कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने १९९८ मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली. मुंबईचे डॉ. विठ्ठल बेल्लुबी आणि विदुला बेल्लुबी यांनी डॉक्टरांना सांगीतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात व्हावी अशी मेडिकल असोसिएशनची इच्छा होती. ती रविवारी पूर्ण झाली, असे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के यांनी सांगितले. यानिमित्ताने डॉक्टरांमधील प्रतिभेला वाव मिळतो असे डॉ. राजेंद्र वायचळ यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या या बहारदार सांगीतिक अंतिम स्पर्धेचे परीक्षण राजप्रसाद धर्माधिकारी आणि माहेश्वरी गोखले यांनी केले. डॉ. मंजिरी वायचळ यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव डॉ. गीता पिल्लई यांनी आभार मानले. यावेळी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे आर्ट सर्कलचे समन्वयक डॉ. पी. एम. चौगुले, सचिव डॉ. गीता पिल्लई, खजानीस डॉ. शीतल देसाई, डॉ. संजय घोटणे, कांदिवली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पारधीये, डॉ. विठ्ठल बेल्लुबी, विदुला बेल्लुबी, डॉ. भरत जोबनपुत्र, डॉ. अमर आडके, डॉ. सूरज पवार, डॉ. रेश्मा पवार, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. प्रिया शहा, आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे विजेते

द्वंद्व गीते

प्रथम क्रमांक : डॉ. नियती बलसे व डॉ. राजेंद्र शेट्टी, मुंबई

द्वितीय क्रमांक : डॉ. अदिती केसरकर व डॉ. केतन बदानी, मुंबई,

सुगम संगीत ( स्त्री)

प्रथम क्रमांक- डॉ. मेधा लिमये, सांगली.

द्वितीय क्रमांक- श्रीया हनमशेट्टी, कोल्हापूर.

सुगम संगीत (पुरुष)

प्रथम क्रमांक- डॉ. राजेंद्र शेट्टी, मुंबई,घाटकोपर

द्वितीय क्रमांक- डॉ. केदार साठे, पुणे

उपशास्त्रीय म्हणजे सेमी क्लासिकल(स्त्री)

प्रथम क्रमांक- डॉ. क्षमा आघोर, नाशिक

द्वितीय क्रमांक- डॉ. आदिती सष्टे, अलिबाग

उपशास्त्रीय म्हणजे सेमी क्लासिकल(पुरुष )

प्रथम क्रमांक- डॉ. सुश्रुत हर्डीकर, कोल्हापूर.

द्वितीय क्रमांक- डॉ. मिलिंद सुरवडे, मुंबई, मीरा रोड

आणि विशेष परीक्षक पारितोषिक :

डॉ. चिंतामणी ताम्हणकर, कोल्हापूर.

फोटो: ०७०२२०२१-कोल-मेडीकल

फोटो ओळ : कोल्हापुरात रविवारी शाहूी स्मारक भवनमध्ये डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळ्यातील विजेते स्पर्धक.

Web Title: Kolhapur, Mumbai won the Doctor's Singing Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.