कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून अत्यावश्यक कामातही दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:56 PM2017-10-11T17:56:18+5:302017-10-11T17:59:30+5:30

महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील प्रचंड प्रवाहामुळे सांडपाणी वाहून नेणारी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. पण ही पाईप पूर्ववत जोडण्याच्या कामाला एक महिन्यानंतरही सुरवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. पंचगंगा नदी प्रदुषणपश्नी एकीकडे राष्टÑीय हरित लवादाकडून फटके लगावले जात असतानासुध्दा प्रदुषण रोखण्याच्या कामात कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून निष्काळजीपणा दाखविला जात असून ही बाब नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे.

The Kolhapur Municipal Administration also has the necessary work to delay the work | कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून अत्यावश्यक कामातही दिरंगाई

 कोल्हापूर शहरातील जयंती नाल्यातील सांडपाणी वाहून नेणारी पाईप लोखंडी पूलासह कोसळलेले आहे. गेल्या एक महिन्यापासून ती तशीच पडून असून त्याच्या दुरस्तीकडे किंवा नवीन पूल उभारण्याच्या कामात प्रशासनाने चालढकल केली आहे. जयंती नाल्यातील सांडपाणी अडविण्याकरीता टाकलेल्या सर्व फळ्या काढण्यात आल्यामुळे सर्व सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. सध्या पाऊस असल्याचे कारण देत सांडपाणी उपसा केले जात नसल्याचा दावा अधिकारी करत आहेत. छाया : आदित्य वेल्हाळ

Next
ठळक मुद्देमहिन्यानंतरही पाईप जोडणीच्या कामाला सुरवात नाहीजयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगा थेट नदीत

कोल्हापूर : एक महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील प्रचंड प्रवाहामुळे सांडपाणी वाहून नेणारी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. पण ही पाईप पूर्ववत जोडण्याच्या कामाला एक महिन्यानंतरही सुरवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.

पंचगंगा नदी प्रदुषणपश्नी एकीकडे राष्टÑीय हरित लवादाकडून फटके लगावले जात असतानासुध्दा प्रदुषण रोखण्याच्या कामात प्रशासनाकडून निष्काळजीपणा दाखविला जात असून ही बाब नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे.


शहरातील सर्व भागातील जयंती नाल्यातून वाहून येणारे सांडपाणी दसरा चौक येथील पंप अ‍ॅन्ड संप हाऊस येथे अडविण्यात येते. तेथून ते पाणी उपसा करुन कसबा बावडा येथील सांडपाणी शुध्दीकरण केंद्राकडे पाठविण्यात येते. उपसा केलेले सांडपाणी वाहून नेण्याकरीता संप अ‍ॅन्ड पंप हाऊस येथे पूर्वी २०० अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात आल्या होत्या. परंतू २०१४ मध्ये त्याची क्षमता वाढविण्यात आली. सध्या ४५० अश्वशक्तीच्या ४ मोटारी हे काम करत आहेत.


१३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्याला अक्षरश: उधाण आले होते. त्यावेळी पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने नाल्यातून जाणाºया तीन पाईप पैकी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. चुकीच्या पध्दतीने या पूलाचे डिझाईन केल्यामुळे कधी ना कधी तो कोसळणार याची अधिकाºयांना खात्री होतीच, तो १३ सप्टेंबरच्या पावसात कोसळला.

गेल्या महिन्याभरापासून हा पूल व पाईप कोसळलेल्या अवस्थेतच नाल्यात पडलेला आहे. त्यामुळे नाल्यातील सर्व मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यातून प्रदुषणाचा मात्र वाढत चालला असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महिन्याभरात फक्त अंदाजपत्रकच

जयंती नाल्यातील मैलामिश्रीत सांडपाणी वाहून नेणारी पाईप पूलासह कोसळल्यानंतर त्याचे दुरुस्तीचे अथवा नवीन पूल बांधून पाईप जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र मनपा प्रशासनाने केवळ नवीन काम करताना कशा प्रकारे करावे आणि त्याला किती खर्च येऊ शकेल याचे अंदाजपत्रक तयार करुन घेतले.

सांगलीच्या वालचंद कॉलेजमधील तज्ज्ञांनी नवीन पूल बांधताना लोखंडी न करता कॉँक्रीटचे पिलर उभे करुन त्यावर ही पाईप जोडावी असा अभिप्राय दिला असून त्यांनी सुचविलेल्या पध्दतीप्रमाणे काम केल्यास त्याला २८ लाख रुपये खर्च येणार आहे.

एक महिन्यात काम पूर्ण होणे अशक्य

ड्रेनेज विभागाकडील दुरुस्तीची कामे अत्यावश्यक सेवेत मोडतात. एक जयंती नाल्यात पाईप फुटून एक महिना झाला तरी प्रशासकीय पातळीवर कागदोपत्री कामाच्या जोडण्या करण्यात वेळ घालविला जात आहे. बुधवारी वालचंद्र कॉलेजच्या तज्ज्ञांचा अहवाल महापालिका प्रशासनास मिळाला आहे. त्यांच्या सल्लयाप्रमाणे काम करण्यासाठी आयुक्तांची मान्यता घ्यावी लागणार आहे.

निविदा काढाव्या लागणार आहेत. पंधरा ते वीस दिवसांची निविदा प्रक्रीया राबवावी लागणार आहे. त्यानंतर पुढे महिना ते दीड महिना काम पूर्ण होण्यास लागणार आहे. तोपर्यंत नदीचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरीकांना प्रदुषीत पाणी प्यावे लागणार आहे.

२५ ते ३० एमएलडी सांडपाणी नदीत

जयंती नाल्यावरील सांडपाणी अडविण्यासाठी टाकलेल्या सर्व फळ्या काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे नाल्यातील २५ ते ३० एम.एल.डी. मैलामिश्रीत सांडपाणी नदीत मिसळत आहे. तसेच दुधाळी नाल्यातून १८ ते २० एम.एल.डी. सांडपाणी नदीत मिसळते.

मनपा प्रशासनाने कसबा बावडा येथे अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रीया केंद्र उभारले आहे. तेथे फक्त जयंती नाल्यातील पाण्यावरच प्रक्रीया केली जात होती. परंतु आता गेल्या महिन्यापासून जयंती नाल्यातील सांडपाणी बावडा येथील प्रक्रीया कें्रद्राकडे जात नाही. केवळ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे यंत्रणा सक्षम असूनही काम व्यवस्थीत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण ही बाब अतिशय गंभीर आहे.

कुठं गेले पर्यावरणवादी?

गेले महिनाभर जयंती नाला थेट पंचगंगा नदीत जाऊन मिळत आहे, त्यामुळे नदी प्रदुषीत होत आहे. परंतु याकडे मनपा अधिकाºयांचे तर लक्ष नाहीत, शिवाय शहरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचेही दुर्लक्ष झालेले आहे. काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी पंगा घेण्याचे बंद केले आहे, तर काही जण सोयीची भुमिका घेत आहेत. त्यामुळेच या घटनेचे गांभीर्य कोणालाच राहिलेले नाही. नदीच्या खालच्या बाजूला रहात असलेल्या लोकांना साथीचे आजार उद्भवल्यावरच यंत्रणा जागी होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

 

Web Title: The Kolhapur Municipal Administration also has the necessary work to delay the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.