Kolhapur Municipal Corporation Election 2022: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, जाणून घ्या प्रभागानुसार आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:57 PM2022-05-31T13:57:02+5:302022-05-31T15:36:18+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात असतील.
कोल्हापूर : येथील महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात जाहीर करण्यात आली. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मोर्चबांधणीला वेग येणार आहे. महापालिका निवडणूक यंदा पहिल्यादांच त्रिसदस्य पद्धतीने होणार आहे. यामुळे नव्या प्रभाग रचनेत ३१ प्रभाग झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र आहेत. पण महापालिकेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात असतील. त्यामुळे कोणत्या पक्षांकडून कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असणार हेच आता पाहावे लागणार आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणानंतर कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण पडले आहे स्पष्ट झाले आहे. आरक्षित प्रभाग नेमकं कसे जाणून घ्या..
असे आहे आरक्षित प्रभाग
अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग क्रमांक - ७ अ, ४ अ, ९ अ, १३ अ, २८ अ, ३० अ,
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक - १५ अ, १९ अ, २१ अ, ५ अ , १ अ, १८ अ
सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक - १ ब, २ ब, ३ अ, ४ ब, ५ ब , ६ अ, ६ ब, ७ ब, ८ अ, ८ ब, ९ ब, १० अ, ११ अ, ११ ब, १२ अ, १३ ब, १४ अ, १५ ब, १६ अ, १६ ब, १७ अ, १८ ब, १९ ब, २० अ, २१ ब, २२ अ, २२ ब, २३ अ, २४ अ, २४ ब, २५ अ, २५ ब, २६ अ, २७ अ, २७ ब, २८ ब, २९ अ, ३० ब, ३१ अ
अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक - २ अ
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक - १ क, २ क, ३ ब, ३ क, ४ क, ५ क, ६ क, ७ क, ८ क, ९ क, १० ब, १० क, ११ क, १२ ब, १२ क, १३ क, १४ क, १५ क, १६ क, १७ क, १८ क, १९ क, २० क, २१ क, २२ क, २३ क, २४ क, २५ क, २६ क, २७ क, २८ क, २९ क, ३० क, ३१ ब
सहा जूनपर्यंत हरकतींसाठी मुदत
१ जूनला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर ६ जूनपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना महापालिका आयुक्त, मुख्य निवडणूक कार्यालय, सासने ग्राउंडसमोर, ताराबाई पार्क येथे दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत आहे.
- एकूण प्रभाग : ३१
- नगरसेवकांची संख्या : ९२
- त्रिसदस्य प्रभाग संख्या : ३०
- द्विसदस्य प्रभाग संख्या : १
- अनुसूचित जातीसाठी आरक्षित होणारे प्रभाग : ६
- अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग : ६
- अनुसूचित जमाती प्रभाग संख्या : १
- सर्वसाधारण महिला प्रभाग : ४०
- खुला : ३९ किंवा ४०