कोल्हापूर महापालिकेतर्फे शहीद जवानांच्या नातेवाइकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 06:22 PM2018-12-15T18:22:15+5:302018-12-15T18:25:55+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरिता धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावीत असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेच्या वतीने शनिवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते शाल, साडीचोळी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरिता धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावीत असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेच्या वतीने शनिवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते शाल, साडीचोळी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात तसेच स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ भारत सरकार व प्रसारण मंत्रालय फिल्ड आउटरिच ब्यूरो, कोल्हापूर विभागांतर्गत घेण्यात आलेल्या शालेय चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महापौर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्राथमिक स्तर चित्रकला स्पर्धा - प्रथम क्रमांक : हर्षवर्धन माने, द्वितीय क्रमांक : सदिया इर्शाद पठाण, तृतीय क्रमांक : कुणाल विश्वास कांबळे. उत्तेजनार्थ - केदार संतोष घोरपडे.
माध्यमिक स्तर चित्रकला स्पर्धा - प्रथम क्रमांक : राधा पी. पारकर द्वितीय क्रमांक : वरद विजय साळोखे, तृतीय क्रमांक : आशिया सी. पटवेगार, उत्तेजनार्थ : आफ्रिदी तन्वीर नाइकवडी.
निबंध स्पर्धा - प्राथमिक स्तर - प्रथम क्रमांक : अमर पाटील, द्वितीय क्रमांक : आदित्य सुरेश गुरव, तृतीय क्रमांक : प्रेरणा विश्वास पाटील.
निबंध स्पर्धा - माध्यमिक स्तर - प्रथम क्रमांक : राजनंदिनी राजीव जरग, द्वितीय क्रमांक : स्वर्णिका धनंजय कराळे, तृतीय क्रमांक : यल्लवा महालिंग आंबी
यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर भूपाल शेटे, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक शेखर कुसाळे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सत्कारमूर्ती वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी
ऊर्मिला मरळे (निवृत्ती मरळे), सुनील कांबळे (साताप्पा कांबळे), सत्यवान रावराणे (लक्ष्मण रावराणे), कांचनदेवी भोसले (जयसिंग भोसले), माणिक वालकर (कॅप्टन शंकर वालकर), सुनीता देसाई (मेजर मच्छिंद्र देसाई), आनंदी उलपे (दिगंबर उलपे), श्रीमती मनीषा सूर्यवंशी (अभिजित सूर्यवंशी), व्यंकोजी शिंदे (मेजर सत्यजित शिंदे), शांता चिले (सुनील चिले), जाई जाधव (भगवान जाधव), संजय खामकर (दत्तात्रय खामकर), पार्वतीबाई माने (अशोक माने),अंजनी पाटील (श्रीकांत पाटील).