कोल्हापूर :खासबाग, बिंदू चौक भिंतीलगतच्या मुताऱ्या भुईसपाट, निवेदन देऊनही महापालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 07:19 PM2018-02-06T19:19:45+5:302018-02-06T19:23:57+5:30
ऐतिहासिक खासबाग मैदान आणि बिंदू चौक भिंतीलगतच्या मुताऱ्या नरेंद्र मोदी विचार मंच भारत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भुईसपाट केल्या. याबाबत कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना २५ जानेवारीला मंचने निवेदन दिले होते.
कोल्हापूर : ऐतिहासिक खासबाग मैदान आणि बिंदू चौक भिंतीलगतच्या मुताऱ्या नरेंद्र मोदी विचार मंच भारत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भुईसपाट केल्या. याबाबत कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना २५ जानेवारीला मंचने निवेदन दिले होते.
मंगळवारी सकाळी बिंदू चौकात कार्यकर्त्ते जमले.तेथील भिंतीलगतची मुतारी पाडून कार्यकर्त्ते खासबाग येथे कार्यकर्त्ते गेले. या ऐतिहासिक दोन्ही वास्तुच्या संवर्धनाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गंत व्यापक स्वच्छता मोहिम राबविली.
यावेळी दोन्ही मुताऱ्या भुईसपाट करण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेला निवेदनाद्वारे सात दिवसाचा अल्टिमेटम नरेंद्र मोदी विचार मंचने दिला होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मुताऱ्या पाडण्यात आल्या.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख सुनील सामंत, शहरप्रमुख हणमंतराव भोसले, महिला आघाडी शहर प्रमुख सृष्टी मोरे, ललिता माजगांवकर, विणा सावण्यावर, कल्याणी जाधव, विद्यालक्ष्मी राजहंस, कोमल देवाळे, दत्तात्रय भारती, राहूल नाईक, अनिकेत वाघ, गणेश लाड, बाळासाहेब इंडिकर, तानाजी पाटील, संजय पाटील, शिवाजीराव चौगुले, प्रितम यादव, स्वप्निल साळोखे, संग्राम नाळे, डॉ. डी.एस.शेलार आदींनी परिश्रम घेतले. याबाबतचे पत्रक सुनील सामंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.