कोल्हापूर महानगरपालिकेने केला दिवसात एक कोटीचा घरफाळा वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:55 AM2019-03-26T11:55:20+5:302019-03-26T11:57:56+5:30

कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा विभागाने सोमवारी एकाच दिवसात एक कोटी १६ लाख रुपयांचा घरफाळा गोळा केला. याबाबत चारही विभागीय कार्यालयांना उद्दिष्ट्य निश्चित करून देऊन वसुलीकरिता करनिर्धारक व संग्राहक, विभागाचे अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी केले होते.

Kolhapur Municipal Corporation recovered 1 crores of property during the day | कोल्हापूर महानगरपालिकेने केला दिवसात एक कोटीचा घरफाळा वसूल

कोल्हापूर महानगरपालिकेने केला दिवसात एक कोटीचा घरफाळा वसूल

Next
ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेने केला दिवसात एक कोटीचा घरफाळा वसूलसवलत ३१ मार्चपर्यंत, दंडामध्ये ५० टक्के रक्कम सूट

कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाने सोमवारी एकाच दिवसात एक कोटी १६ लाख रुपयांचा घरफाळा गोळा केला. याबाबत चारही विभागीय कार्यालयांना उद्दिष्ट्य निश्चित करून देऊन वसुलीकरिता करनिर्धारक व संग्राहक, विभागाचे अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी केले होते.

त्यानुसार घरफाळा विभागाने सामूहिक प्रयत्न करत सोमवारी एकाच दिवसात एक कोटी १६ हजार इतकी वसुली करून संकल्प पूर्ण केला. यापुढेही अशाच पद्धतीने वसुली मोहिम राबविण्यात येणार आहे. ज्या मिळकतधारकांची पुढील वर्षात थकबाकी असलेल्या मिळकतीवर महानगरपालिकेचा बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

येत्या गुरुवारपासून पालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ यावेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत तर वर्षअखेरीच्या दिवशी रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही नागरी सुविधा केंद्रे सुरू राहणार आहेत.

महानगरपालिकेने थकीत घरफाळा एकरकमी जमा केल्यास दंडामध्ये ५० टक्के रक्कम सवलत, सूट दिलेली आहे, ही सवलत ३१ मार्चपर्यंत आहे, या सवलत योजनेचा लाभ करदात्यांनी घ्यावा, असे आवाहन घरफाळा विभागाने केले आहे.
 

 

Web Title: Kolhapur Municipal Corporation recovered 1 crores of property during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.