कोल्हापूर महापालिका पोटनिवडणूक : उमेदवारांना चिन्हे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:52 PM2019-06-12T12:52:44+5:302019-06-12T12:54:11+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी सिद्धार्थनगर आणि पद्माराजे उद्यान या प्रभागांतील उमेदवारांना मंगळवारी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली. यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताराबाई गार्डन परिसरातील मुख्य निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती.

Kolhapur municipal by-election: Distribution of symbols to candidates | कोल्हापूर महापालिका पोटनिवडणूक : उमेदवारांना चिन्हे वाटप

कोल्हापूर महापालिका पोटनिवडणूक : उमेदवारांना चिन्हे वाटप

Next
ठळक मुद्दे कोल्हापूर महापालिका पोटनिवडणूक : उमेदवारांना चिन्हे वाटपप्रचारात रंगत वाढणार, दि.२३ जूनला मतदान

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी सिद्धार्थनगर आणि पद्माराजे उद्यान या प्रभागांतील उमेदवारांना मंगळवारी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली. यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताराबाई गार्डन परिसरातील मुख्य निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती.

सिद्धार्थनगर प्रभागात तिरंगी, तर पद्माराजे उद्यान प्रभागात सहा उमेदवार असल्याने तेथे बहुरंगी लढत होणार आहे. मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांप्रमाणे उमेदवारांना निवडणूक चिन्हे वाटप केली.

तसेच निवडणूक खर्चाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सादर करावयाच्या नमुन्याबाबत मार्गदर्शन करून खर्च सादर करण्याबाबत उमेदवारांना सूुचना दिल्या. दोन्हीही प्रभागांतील पोटनिवडणुकीसाठी दि. २३ जून रोजी मतदान होत आहे; तर दि. २४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली, ती पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्रमांक २८ सिद्धार्थनगर : १) सुशील सुधाकर भांदिगरे (अपक्ष- कॅमेरा), २) नेपोलियन अशोक सोनुले (ताराराणी आघाडी पक्ष -कपबशी), ३) जय बाळासो पटकारे (काँग्रेस -हात). प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान : १) महेश शंकरराव चौगले (अपक्ष- नारळ), २) शेखर महादेव पोवार (अपक्ष- दूरदर्शन संच), ३) राजेंद्र वसंतराव चव्हाण (अपक्ष - गॅस सिलिंडर), ४) पीयूष मोहन चव्हाण (शिवसेना- धनुष्यबाण), ५) अजित विश्वास राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस- घड्याळ), ६) स्वप्निल भीमराव पाटोळे (शेतकरी कामगार पक्ष- कपबशी).
 

 

Web Title: Kolhapur municipal by-election: Distribution of symbols to candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.