कोल्हापुरचे संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 10:53 AM2021-06-12T10:53:28+5:302021-06-12T10:54:11+5:30
Music Kolhapur : कोल्हापुरची नामवंत संगीतकार जोडी चंद्र-विजयमधील चंद्रकांत कागले (वय ५६) यांचे आज, सकाळी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांनी मराठी रंगभूमि आणि चित्रपट सृष्टिमध्ये गेली ४० वर्षे संगीत,गायन, तबलावादन, आणि अभिनय अशा विविध स्तरावर आपले नाव केले होते. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वाना परिचित होते.
कोल्हापुर : कोल्हापुरची नामवंत संगीतकार जोडी चंद्र-विजयमधील चंद्रकांत कागले (वय ५६) यांचे आज, सकाळी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांनी मराठी रंगभूमि आणि चित्रपट सृष्टिमध्ये गेली ४० वर्षे संगीत,गायन, तबलावादन, आणि अभिनय अशा विविध स्तरावर आपले नाव केले होते. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वाना परिचित होते.
चंद्रकांत कागले यांनी संगीतकार म्हणून प्रसन्न कुलकर्णी यांचे "अजा ग अजा" हे पहिले नाटक संगीतबध्द केले. त्यानंतर त्यांचा मित्र विजय पाठक यांच्याबरोबर सिनेमा जगतात चंद्र-विजय या नावाने संगीत दिले. त्यांनी जितेंद्र देशपांडे दिग्दर्शित सप्त पुत्तुलिका या नाटकासाठी संगीत दिले होते.या चंद्र-विजय या जोडीने वसंत पेंटर यांचा सड़ा हळद-कुंकवाचा, बाळू मामाच्या नावानं चांगभलं हे मराठी चित्रपट संगीतबध्द केले.
त्यांनी गायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ति, साधना सरगम, स्वप्निल बांदोडकर, शंकर महादेवन अशा नामांकित गायकांकडून गाऊन घेतले. याशिवाय अनुप जलोटा, अरुण दाते, अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ आदींसोबत अनेक नामवंत गायकांना साथ केली आहे. त्यांनी काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले होते.
चंद्र-विजय म्हणजेच चंद्रकांत कागले आणि विजय पाठक या जोडीने देशप्रदेशात ह्यफरमाईश ए गझलह्ण या कार्यक्रमाचे पाच हजार कार्यक्रम केले. चंद्रकांत कागले, विजय पाठक, उदय सुतार, श्रीकांत साळोखे यांनी मिळून ह्यसुरभि ऑर्केस्ट्राह्णची निर्मिति केली होती. ह्यचंदूह्ण नावाने ते चित्रसृष्टीत ओळखले जात. अलिकडेच त्यांनी झी टीव्ही, ई मराठी अशा विविध वाहिनीच्या मराठी मालिकांमधे विविध भूमिका केल्या होत्या.
ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद होते. संगीतकार, उत्तम संगीत संयोजक चंद्रकांत कागले यांच्या निधनामुळे सर्व मराठी चित्रपट व्यावसायिकांच्यातर्फे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.