कोल्हापूर : ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता यात्रा रविवारी कोल्हापूरात, अभाविपतर्फे १६ जानेवारीला स्वागत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 06:24 PM2018-01-13T18:24:08+5:302018-01-13T18:29:27+5:30
आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता यात्रा-२०१८ निमित्त ईशान्य भारतातील ३0 विद्यार्थ्यांची यात्रा रविवारी कोल्हापूरात येत आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या इशान्येतील विद्यार्थ्यांचा कोल्हापुर शाखेमार्फत १६ जानेवारी रोजी कोल्हापूरात जाहीर स्वागत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
कोल्हापूर : आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता यात्रा-२०१८ निमित्त ईशान्य भारतातील ३0 विद्यार्थ्यांची यात्रा रविवारी कोल्हापूरात येत आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या इशान्येतील विद्यार्थ्यांचा कोल्हापुर शाखेमार्फत १६ जानेवारी रोजी कोल्हापूरात जाहीर स्वागत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
गेली ६८ वर्षे शैक्षणिक व सामाजिक व राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर अभाविप रचनात्मक दृष्टीकोनातून काम करीत आहे. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहचवावा यासाठी अभाविप दरवर्षी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील विविध प्रांतातील समाजजीवन आणि संस्कृती यांचा अनुभव देण्याचा प्रयत्न करत असते. या राष्ट्रीय एकात्मतेचा मुक्काम कोल्हापूरात १६ जानेवारीपर्यंत आहे. या कालावधीत या विद्यार्थ्यांना करवीर दर्शन घडविण्यात येणार आहे.
१६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ईशान्य भारतातील या ३० विद्यार्थी प्रतिनिधींचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महानगर मंत्री क्रांती शेवाळे, राष्ट्रीय एकात्मता यात्रेचे संयाजक यश काटवे यांनी दिली आहे.
३ जानेवारी रोजी गुवाहटी येथून सुरु झालेली ही यात्रा कटक, हैदराबाद, हुबळीमार्गे कोल्हापूरात येत असून पुढे मुंबईमार्गे परत गुवाहटीला पोहोचणार आहे. यात्रेचा समारोप २३ जानेवारी रोजी होणार आहे, असे यात्रा समितीचे अध्यक्ष विद्यानंद देवधर आणि सचिव नरेंद्र चांदसरकर यांनी दिली.