कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:43 AM2018-09-04T11:43:25+5:302018-09-04T11:45:11+5:30

राष्ट्रवादीवादी कॉँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध नोंदवत अनोखे आंदोलन केले. शहर राष्ट्रवादीच्या वतीने उमा टॉकीज पेट्रोलपंपावर ग्राहकांना काळे गुलाबाचे फूल देऊन सरकारचा निषेध केला.

Kolhapur: Nationalist movement against petrol and diesel price hike | कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने कोल्हापूर शहरात पेट्रोल पंपावर ग्राहकांना काळी फुले देऊन सरकारचा निषेध केला. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जाहिदा मुजावर, आदी उपस्थित होते. 

Next
ठळक मुद्दे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलनग्राहकांना काळे गुलाबाचे फूल देऊन सरकारचा निषेध

कोल्हापूर : राष्ट्रवादीवादी कॉँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध नोंदवत अनोखे आंदोलन केले. शहर राष्ट्रवादीच्या वतीने उमा टॉकीज पेट्रोलपंपावर ग्राहकांना काळे गुलाबाचे फूल देऊन सरकारचा निषेध केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, भाजप सरकारने पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे सामान्य माणूस पिचला असून, याविरोधात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे.

राष्ट्रवादीवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा फटका सामान्य माणसाला बसत आहे. सरकारच्या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी आगामी काळात कार्यकर्त्यांनी कंबर कसावी.

यावेळी उपमहापौर महेश सावंत, महिला शहराध्यक्षा जाहिदा मुजावर, सुनील देसाई, सुहास साळोखे, नगरसेविका सरीता मोरे, शीतल तिवडे, फिरोज सरगूर, रेहेना नागरकट्टी, वंदना जाधव, जहॉँगीर अत्तार, प्रकाश हिरेमठ, सुनील जाधव, भीमराव आडके, रामराजे बदाले, रियाज कागदी, राजाराम पाटोळे, प्रकाश पाटील, गणपतराव बागडी, आदी उपस्थित होते.


 

 

Web Title: Kolhapur: Nationalist movement against petrol and diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.