कोल्हापूर-निजामुद्दीन एक्सप्रेस ६ जुलैपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 06:15 PM2021-06-10T18:15:10+5:302021-06-10T18:16:47+5:30
Railway Kolhapur : लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर ते निजामुद्दीन एक्सप्रेस (दिल्ली) रेल्वे येत्या ६ जुलैपासून पुर्ववत दर मंगळवारी सुरु होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून गुरुवारपासून बुकींगला सुरुवातही झाली आहे.
कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर ते निजामुद्दीन एक्सप्रेस (दिल्ली) रेल्वे येत्या ६ जुलैपासून पुर्ववत दर मंगळवारी सुरु होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून गुरुवारपासून बुकींगला सुरुवातही झाली आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंदच आहे. परिस्थिती निवळेल तशी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करण्यावर शासनाने भर दिला आहे. कोल्हापुरातून सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेल्या रेल्वगाड्यांमध्ये निजामुद्दीन एक्सप्रेस एक आहे.
कोल्हापूर, मिरज, सातारा, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, भापोळ, झॉंसी, ग्वाल्हेर, मथूरा, आग्रा, दिल्ली असा प्रवास करणारी ही रेल्वे दर मंगळवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी कोल्हापुरातून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सहा वाजता दिल्लीत पोहचते. तेथून गुरुवारी पहाटे ५ वाजून दहा मिनिटांनी सुटून ती दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात दीड वाजता पोहचते.
एक सेंकड एसी, तीन थ्री एसी, ९ स्लीपर, ६ सेंकड क्लास अशा कोचसह धावणाऱ्या या रेल्वेचा क्रमांक ०२०४७ असा आहे. गुरुवारपासून याचे बुकींगही सुरु झाले. पहिलाच दिवस असल्याने आणि अजून रेल्वे सुरु होणार असल्याची फारशी कल्पना नसल्याने स्टेशनवर फारशी गर्दी दिसत नव्हती.