कोल्हापूर निजामुद्दीन एक्स्प्रेस ६ जुलैपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:23+5:302021-06-11T04:17:23+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर ते निजामुद्दीन एक्स्प्रेस (दिल्ली) रेल्वे येत्या ६ जुलैपासून पूर्ववत दर मंगळवारी सुरू होत ...

Kolhapur Nizamuddin Express will run from July 6 | कोल्हापूर निजामुद्दीन एक्स्प्रेस ६ जुलैपासून धावणार

कोल्हापूर निजामुद्दीन एक्स्प्रेस ६ जुलैपासून धावणार

Next

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर ते निजामुद्दीन एक्स्प्रेस (दिल्ली) रेल्वे येत्या ६ जुलैपासून पूर्ववत दर मंगळवारी सुरू होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून गुरुवारपासून बुकिंगला सुरुवातही झाली आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंदच आहे. परिस्थिती निवळेल तशी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करण्यावर शासनाने भर दिला आहे. कोल्हापुरातून सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेल्या रेल्वगाड्यांमध्ये निजामुद्दीन एक्स्प्रेस एक आहे. कोल्हापूर, मिरज, सातारा, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, भापोळ, झासी, ग्वाल्हेर, मथुरा, आग्रा, दिल्ली असा प्रवास करणारी ही रेल्वे दर मंगळवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी कोल्हापुरातून सुटते आणि दुसऱ्या दिवशी ६ वाजता दिल्लीत पोहचते. तेथून गुरुवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी सुटून ती दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात १.३० वाजता पोहचते.

एक सेकंड एसी, तीन थ्री एसी, ९ स्लीपर, ६ सेकंड क्लास अशा कोचसह धावणाऱ्या या रेल्वेचा क्रमांक ०२०४७ असा आहे. गुरुवारपासून याचे बुकिंगही सुरू झाले. पहिलाच दिवस असल्याने आणि अजून रेल्वे सुरू होणार असल्याची फारशी कल्पना नसल्याने स्टेशनवर फारशी गर्दी दिसत नव्हती.

Web Title: Kolhapur Nizamuddin Express will run from July 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.