Kolhapur North Assembly by-election:‘कोल्हापूर उत्तर’साठी चार तासांत ६० हजार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:52 AM2022-04-12T11:52:37+5:302022-04-12T12:06:02+5:30

सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरात एकूण २०.५७ टक्के मतदान झाले. त्यात २३.७३ टक्क्यांसह पुरूष मतदार आघाडीवर राहिले. महिलांचे प्रमाण कमी होते. त्यांचे १७.४१ टक्के मतदान झाले.

Kolhapur North Assembly by election 60,000 votes in three hours for Kolhapur North | Kolhapur North Assembly by-election:‘कोल्हापूर उत्तर’साठी चार तासांत ६० हजार मतदान

Kolhapur North Assembly by-election:‘कोल्हापूर उत्तर’साठी चार तासांत ६० हजार मतदान

Next

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांविरोधात ताकदीने मैदानात उतरल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरात एकूण २०.५७ टक्के मतदान झाले. त्यात २३.७३ टक्क्यांसह पुरूष मतदार आघाडीवर राहिले. महिलांचे प्रमाण कमी होते. त्यांचे १७.४१ टक्के मतदान झाले.

पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

कमला कॉलेज येथील मतदान केंद्राचे प्रवेशद्वार उघडण्यावरून, तर भगव्या रंगाचे छत असलेले बूथ काढण्यावरून कॉमर्स कॉलेज परिसरात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. राजारामपुरीच्या तुलनेत शाहुपुरी, मंगळवारपेठेत मतदानाची प्रक्रिया अधिक गतीने सुरू होती. केंद्रामध्ये गेल्यानंतर एका मतदाराला मतदान करण्यास दोन-तीन मिनिटे लागत होती.

सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण २०.५७ टक्के मतदान

दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. शहरातील विविध परिसरातील मतदान केंद्रांवर महाविकास आघाडी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ लावले होते. मतदान कक्ष, यादीतील क्रमांक सांगण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत होते. दरम्यान, सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत एकूण २०.५७ टक्के मतदान झाले. मतदानाची एकूण संख्या ६००१८ इतकी होती. त्यात ३४५८९ पुरूष, तर २५४२९ महिला मतदारांचा समावेश होता.

Web Title: Kolhapur North Assembly by election 60,000 votes in three hours for Kolhapur North

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.