Kolhapur North By Election Result: लोकमतची हवा..अंदाज ठरला खरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 01:27 PM2022-04-16T13:27:37+5:302022-04-16T13:47:36+5:30
गुरुवारी (दि १४) लोकमतने हॅलोचे मुख्य वृत्त प्रसिध्द केले होते. त्यामध्ये जयश्री जाधव यांचीच हवा, सत्यजित कदम यांचाही दावा असे त्यात म्हटले होते.
कोल्हापूर : निवडणूक कोणतेही असो, लोकमतने निकालाच्या आधीच व्यक्त केलेला अंदाज यानिवडणूकीतही खरा ठरला. या निवडणूकीसाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी (दि १४) लोकमतने हॅलोचे मुख्य वृत्त प्रसिध्द केले होते. त्यामध्ये जयश्री जाधव यांचीच हवा, सत्यजित कदम यांचाही दावा असे त्यात म्हटले होते.
यापूर्वी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका आणि गोकूळच्या निवडणूकीचा निकालही लोकमतने आधीच वर्तवला होता. व तो तंतोतंत खरा ठरला होता. त्यामुळे मतदानानंतर लोकमतचा अंदाज काय आहे याकडे कोल्हापूरकरांचे कायमच लक्ष असते. त्या विश्र्वासार्हतेवर या निकालानेही शिक्कामोर्तब केले.
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत शिवसेनेचे सहा आमदार निवडून येणार असे लोकमतने आधीच नावांसह जाहीर केले होते. पुढे २०१९ ला शिवसेनेचे राधानगरी मतदार संघातून एकमेव प्रकाश आबिटकर हेच निवडून येणार असल्याचे लोकमतने जाहीर केले होते. निकालही तसेच लागले आहेत. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीतही संजय मंडलिक यांच्या विजयाचे भाकित अगोदरच केले होते. गोकूळच्या निवडणूकीत सत्तांतर होणार असल्याचा अंदाजही लोकमतने व्यक्त केला व घडलेही तसेच.