Kolhapur North By Election Result: करूणा मुंडेंना मिळाली 'इतकी' मते, ‘नोटा’ चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 10:55 AM2022-04-16T10:55:41+5:302022-04-16T11:11:40+5:30
कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूक झाली. त्याच्या मतमोजणीमध्ये शनिवारी ...
कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक झाली. त्याच्या मतमोजणीमध्ये शनिवारी नवव्याफेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना पहिल्या क्रमांकावर होत्या. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते. इतर पक्ष आणि अपक्ष असे तेरा उमेदवार रिंगणात होते. मात्र, ६१८ मतांसह ‘नोटा’ चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर राहिला. करूणा मुंडे, विजय केसरकर, राजेश नाईक हे ५७ मतांवर आहेत.
राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाम आणि प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात चौथ्याफेरी अखेर एकूण ६५९४२ मतांची मोजणी झाली. त्यात जयश्री जाधव यांना ३६७३७ मते, सत्यजीत कदम यांना २७७३८, तर ‘नोटा’ पर्यायाला ६१८ मते मिळाली. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीमध्ये ‘नोटा’ चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर होता. अन्य उमेदवारांना यशवंत शेळके (१३१), विजय केसरकर (५७), शाहीद शेख (२२३), सुभाष देसाई (५०), बाजीराव नाईक (१८), भारत भोसले (२१), मनिषा कारंडे (१५), अरविंद माने (२२), अजिज मुस्ताक (२४), राजेश नाईक (५७), राजेश कांबळे (५१), संजय मागाडे (१२३) अशी मते मिळाली आहेत.
करूणा मुंडे यांनीही या निवडणूक रिंगणात उडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. प्रचारसभेदरम्यान आपल्याला धमक्या आल्याच्या आरोप त्यांनी केला होता. मात्र ही लढत प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात झाली. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावल्याने जिल्हयातील राजकीय वातावरण तापले होते. मतदानानंतर महाविकास आघाडी व भाजपकडूनही विजयी दावा करण्यात आला. मात्र आज निकालानंतर मात्र काँग्रेसनेच आघाडी घेतल्याचे दिसून आले. सध्या हाती आलेल्या निकालानुसार जयश्री जाधव 11239 मतांनी आघाडीवर आहेत.