Karuna Sharma: धनंजय मुंडेंसोबतच्या प्रेमकहाणीचं पुस्तक शेवटच्या टप्प्यात; करुणा शर्मांनी अर्ज भरताना ‘बॉम्ब’ फोडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:57 PM2022-03-24T12:57:06+5:302022-03-24T12:58:44+5:30

कोल्हापुरातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

kolhapur north bypoll election 2022 karuna sharma big allegations on dhananjay munde in kolhapur | Karuna Sharma: धनंजय मुंडेंसोबतच्या प्रेमकहाणीचं पुस्तक शेवटच्या टप्प्यात; करुणा शर्मांनी अर्ज भरताना ‘बॉम्ब’ फोडला!

Karuna Sharma: धनंजय मुंडेंसोबतच्या प्रेमकहाणीचं पुस्तक शेवटच्या टप्प्यात; करुणा शर्मांनी अर्ज भरताना ‘बॉम्ब’ फोडला!

googlenewsNext

कोल्हापूर: देशातील विधानसभा निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीचे विशेष म्हणजे करुणा शर्मा-मुंडे यांनीही (Karuna Sharma) ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा शर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा शर्मा पोहोचल्या होत्या. यानंतर माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात असून, त्यातून अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात २५ वर्षांची आमची कहाणी असणार आहे. यामध्ये पुराव्यांसह लग्नाचे फोटोही असतील. हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झाले आहे. हिंदी आणि मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित केले जाणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. 

माझ्या कागदपत्रांमध्ये काहीही ऋटी नाहीत

नावावरुन ऋटी निर्माण होण्याच्या शक्यतेवर बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, माझ्याकडे पेपर आहेत, त्या आधारावरच फॉर्म भरला आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काहीही ऋटी नाहीत. टेक्निकल प्रॉब्लेम तर माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये आहेत. त्यांनी सहा-सहा मुले लपवली आहेत. अनेक पत्नी लपवल्या आहेत, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. माझ्या फॉर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. जगाला हे पुरावे दिसतीलच, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. 

महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार

मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशिर्वाद आहे. जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असून, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापुरातील घराणेशाहीचे राजकारण आपण संपवणार आहोत. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला आहे. 

दरम्यान, आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे? आणि इथले नेते कसे आहेत? चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगेत उभे आहेत, असे करुणा शर्मा यांनी म्हटले होते. कश्मीर फाईल्स सिनेमावर मोठे-मोठे नेते बोलत आहेत. देशामध्ये शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. परंतु, या प्रश्नांवर कोण बोलत नाही. काश्मीर फाइल्स फक्त चित्रपट आहे आणि तो चित्रपटच राहणार आहे. नेत्यांना बोलायचे असेल तर दिशा सालियान, पूजा चव्हाण यांच्यावर बोला, असे करूणा शर्मा यांनी म्हटले होते. 
 

Web Title: kolhapur north bypoll election 2022 karuna sharma big allegations on dhananjay munde in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.