कोल्हापूर : फसवणूकीतील दोघा आरोपींना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:50 IST2018-10-06T14:49:22+5:302018-10-06T14:50:33+5:30
वाहनावर बँकेचा कर्जाच्या थकीत बोजा असताना खोटी कागदपत्रे सादर करून तेच वाहन दूसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.

कोल्हापूर : फसवणूकीतील दोघा आरोपींना नोटीस
कोल्हापूर : वाहनावर बँकेचा कर्जाच्या थकीत बोजा असताना खोटी कागदपत्रे सादर करून तेच वाहन दूसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.
संशयित अमित बाळासाहेब बुक शेट्टे (रा. ताराबाई पार्क), व वैजंती दीपक बसवानी ( रा. गांधीनगर ) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठिवली आहे.
अधिक माहिती अशी, संशयित अमित बुकशेटे व वैजंती बसवानी या दोघांनी मिळून प्रवीण ईश्वर घाटगे ( रा. कोडोली, ता. पन्हाळा ) यांचे नावावर असलेल्या स्विफ्ट कार या वाहनावर शाहूपुरी येथील एका बँकेचा कजार्चा थकीत बोजा आहे.
या दोघांनी बँकेचा बोजा नसल्याची खोटी कागदपत्रे तयार करून ती प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे सादर केले. त्यानंतर हे वाहन वैजंती बसवानी यांच्या नावावर हस्तांतरित केले. २० जुलै २०१८ ते ४ आॅक्टोबर २०१८ या कालवधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी राजाराम वसंतराव कोळी (रा. हातकणंगले) यांनी शाहूपुरी पोलीसांत दोघांविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रणजीत पाटील अधिक तपास करीत आहेत.