कोल्हापूर : ‘स्मार्ट ग्राम’साठी प्रस्ताव मागवले, १00 गुणांचे मूल्यांकन, ४0 लाखांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:50 PM2018-12-20T13:50:41+5:302018-12-20T13:51:49+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होऊ शकतात. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या निकषांच्या आधारे १00 गुणांचे मूल्यांकन करून यातून गावांची निवड करण्यात येणार आहे.
सुरुवातीला गावांनी आपले प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करावयाचे असून ३१ डिसेंबरपर्यंत या गावांची दुसऱ्या तालुक्यातील समितीकडून तपासणी करण्यात येईल. याबाबत कुठल्या गावाला हरकत असल्यास तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करता येईल. यानंतर गरज पडल्यास प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
प्रत्येक तालुक्यातून पहिल्या आलेल्या गावाला प्रत्येकी १0 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या १२ गावांतून एका गावाची निवड जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून करण्यात येणार असून, या गावाला ४0 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ३0 एप्रिल २0१८ पर्यंत ही सर्व निवड प्रक्रिया संपविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सांगितले.