कोल्हापूर : चव्हाण कॉलनीतील एकाचा डेंग्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:05 PM2018-08-13T13:05:24+5:302018-08-13T13:07:25+5:30
नेहरूनगर परिसरातील संजय रामचंद्र देसाई (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, चिले कॉलनीसमोर,कोल्हापूर) यांचा शनिवारी (दि. ११) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक ते १0 आॅगस्ट अखेर शहरातील डेंग्यूचे १२५ तर ग्रामीण भागातील २९ असे एकूण १५४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
कोल्हापूर : नेहरूनगर परिसरातील संजय रामचंद्र देसाई (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, चिले कॉलनीसमोर,कोल्हापूर) यांचा शनिवारी (दि. ११) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक ते १0 आॅगस्ट अखेर शहरातील डेंग्यूचे १२५ तर ग्रामीण भागातील २९ असे एकूण १५४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
चव्हाण कॉलनीतील संजय देसाई यांना आठ दिवसांपूर्वी ताप आला होता; त्यामुळे त्यांना मंगळवारी (दि. ७) शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (दि. १०) त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी मृत्यु झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. ते एका खासगी कंपनीमध्ये कामास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून रक्षाविसर्जन रविवारी झाले.
दरम्यान, नेहरूनगर शेजारील असलेला भाग जवाहरनगर परिसरात दोन महिन्यांपूर्वी डेंग्यू संशयित बहुतांश रुग्ण होते. त्यानंतर आता तेथील प्रमाण कमी झाले आहे.
साडेसात महिन्यांत ११८४ रुग्ण
एक जानेवारी ते १0 आॅगस्ट २०१८ अखेर शहरातील ९९६ तर ग्रामीण भागातील २१८ असे एकूण ११८४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. महापालिका प्रशासन सातत्याने डेंग्यूबाबत जनजागृती मोहीम घेत आहे. महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटल, सीपीआर रुग्णालयामध्ये डेंग्यूचा स्वतंत्र कक्ष आहे.