कोल्हापूर : सीपीआरमध्ये होणार सात पदांची आॅनलाईन कंत्राटी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:22 PM2018-05-08T18:22:57+5:302018-05-08T18:22:57+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिपत्याखाली (एनएचएम) येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आर.बी.एस.के) अंतर्गंत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती होणार आहे. यासाठी मंगळवारपासून आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुरुवात झाली.

Kolhapur: Online contract recruitment for seven posts in CPR | कोल्हापूर : सीपीआरमध्ये होणार सात पदांची आॅनलाईन कंत्राटी भरती

कोल्हापूर : सीपीआरमध्ये होणार सात पदांची आॅनलाईन कंत्राटी भरती

Next
ठळक मुद्दे सीपीआरमध्ये होणार सात पदांची कंत्राटी भरतीआॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुरुवात

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिपत्याखाली (एनएचएम) येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आर.बी.एस.के) अंतर्गंत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती होणार आहे. यासाठी मंगळवारपासून आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुरुवात झाली.

एक वैद्यकिय अधिकारी(स्त्री), औषध निर्मांता व परिचारिका प्रत्येकी तीन अशा एकूण सात जागा सीपीआरमध्ये भरण्यात येणार आहेत. आरोग्य विभागासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गंत सध्या कोल्हापूर जिल्हयात १६८ मंजुर जागांपैकी वैद्यकिय अधिकारी ८३,औषधनिर्माण शास्त्र व परिचारिका प्रत्येकी ३९ असे एकूण १६१ कार्यरत आहे.

सात जागा रिक्त आहेत. त्यासाठी सीपीआरच्या ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्षात संबधिताला कार्यालयीन वेळेत (सकाळी दहा ते सायंकाळ पाच ) अर्ज करता येणार आहे. तसेच याबाबतची सविस्तर माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्ज भरण्याचा अंतिम दिवस सोमवार (दि. १४) आहे. यासाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली असून समिती सदस्य सचिव तथा सीपीआरचे जिल्हाशल्यचिकित्सक आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Online contract recruitment for seven posts in CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.