कोल्हापूर : ‘एफडीआय’च्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करा - ललित गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 08:38 PM2018-09-20T20:38:28+5:302018-09-20T20:40:21+5:30

व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरकारने आणलेले ‘एफडीआय’चे भूत घालविण्यासाठी जिल्याहातील सर्व व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखविली पाहिजे, असे मत

Kolhapur: Oppose the protest against 'FDI' - Lalit Gandhi | कोल्हापूर : ‘एफडीआय’च्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करा - ललित गांधी

कोल्हापूर : ‘एफडीआय’च्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करा - ललित गांधी

Next
ठळक मुद्दे२८ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाया निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणारआॅनलाईन ई-कॉमर्सद्वारे प्रथम फायद्याचे गाजर दाखविले

कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरकारने आणलेले ‘एफडीआय’चे भूत घालविण्यासाठी जिल्याहातील सर्व व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखविली पाहिजे, असे मत कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले. येत्या शुक्रवारी (दि. २८) परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात पुकारलेल्या ‘देशव्यापी बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या जनजागृती सभेत ते बोलत होते.

गांधी म्हणाले, सरकार कुठलेही असो; व्यापाºयांना केवळ बिनपगारी नोकर म्हणून ते राबवीत आहे. आयकर, व्यावसायिक कर अथवा अन्य लक्ष्य असो; जबरदस्तीने अथवा कायद्याच्या धाकाने ते वसूल करण्यासाठी एक हक्काचा घटक म्हणून सरकार व्यापाऱ्यांकडे पाहत आहे. एका बाजूने ‘मेक इन इंडिया’चा नारा द्यायचा, तर मागील बाजूने वॉलमार्ट-फ्लिपकार्टसारख्या परदेशी कंपन्यांना देशात प्रवेश द्यायचा. त्यामुळे एकूणच सरकारचे धोरण देशातील व्यापाºयांना दणका देणारे आहे.

या विरोधात ‘कॅट’ने याचिका दाखल केली होती. मात्र, ती न्यायालयात टिकली नाही. किरकोळ व्यापाºयांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. रस्त्यांवर उतरल्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या मोर्चात ५० हजार व्यापाºयांनी सहभागी व्हावे, याकरिता आज, शुक्रवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या ‘बंद’ला महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, कोल्हापूर चेंबर, अन्य व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शविल्याचेही सांगितले.

‘कॅट’चे संघटन सचिव धैर्यशील पाटील म्हणाले, या निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. आॅनलाईन ई-कॉमर्सद्वारे प्रथम फायद्याचे गाजर दाखविले जाते. त्यानंतर एकदा सवय झाली की मनमानी दर आकारले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालणाºया या निर्णयाविरोधात आताच एकजूट दाखविली पाहिजे. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्ये यांनी प्रास्ताविक, तर जयेश ओसवाल यांनी स्वागत केले. शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले. यावेळी प्रदीप कापडिया, माजी अध्यक्ष आनंद माने यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Kolhapur: Oppose the protest against 'FDI' - Lalit Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.