कोल्हापूर : महापालिकेत निधी लाटण्याचा प्रयत्न, बिंग फुटल्यावर काँग्रेस नगरसेवकांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:26 PM2018-04-11T17:26:23+5:302018-04-11T17:26:23+5:30

‘वाटी तो बोटं चाखी’ या म्हणीप्रमाणे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह मोजक्या नगरसेवकांनीच ५ कोटी ०३ लाखांचा निधी वाटून घेतल्याची बाब समोर आल्यानंतर बुधवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत नाराजी तसेच निषेध व्यक्त केला. याबाबत भाजप-ताराराणी आघाडीतील काही नगरसेवक नाराज झाले असून विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

Kolhapur: Opposition to fund the municipal corporation; | कोल्हापूर : महापालिकेत निधी लाटण्याचा प्रयत्न, बिंग फुटल्यावर काँग्रेस नगरसेवकांत संताप

कोल्हापूर : महापालिकेत निधी लाटण्याचा प्रयत्न, बिंग फुटल्यावर काँग्रेस नगरसेवकांत संताप

Next
ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेत निधी लाटण्याचा प्रयत्नबिंग फुटल्यावर काँग्रेस नगरसेवकांत संताप

कोल्हापूर : ‘वाटी तो बोटं चाखी’ या म्हणीप्रमाणे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह मोजक्या नगरसेवकांनीच ५ कोटी ०३ लाखांचा निधी वाटून घेतल्याची बाब समोर आल्यानंतर बुधवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत नाराजी तसेच निषेध व्यक्त केला. याबाबत भाजप-ताराराणी आघाडीतील काही नगरसेवक नाराज झाले असून विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन सत्यजित कदम यांनी हा निधी ठरावीक नगरसेवकांना दिल्याचा आरोप काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला तर एका हेडखालील बजेटमधील निधी अशाप्रकारे वाटून घेण्याचा प्रयत्न झाला असल्याने आता संपूर्ण अर्थसंकल्पातील सर्व तरतुदी पाहूनच त्याचे नियोजन केले जाईल, असे महापौर स्वाती यवलुजे यांनी सांगितले.

कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात यापूर्वी असे कधी घडले नाही, असे सांगून गटनेते देशमुख म्हणाले की, आम्ही सत्तेत असून देखील प्रत्येकवेळी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना सोबत घेऊन निधी वाटपाचे सूत्र ठरविले; परंतु भाजपचे आशिष ढवळे स्थायी सभापती झाले आणि त्यांनी सर्व संकेत पायदळी तुडवून निधी वाटपात पक्षपातीपणा केला आहे. सभापतींनी अजून आम्हाला संपूर्ण अर्थसंकल्पाची प्रत दिलेली नाही. त्यामुळे आता आम्हाला ते तपासून पाहावे लागणार आहे. जर त्यांनी असाच गोंधळ अन्य हेडमध्येही केला असेल तर आम्हाला ते बदलावे लागेल.

सत्यजित कदम निवडणूक लढवणार आहेत याची आम्हाला जाणीव आहे; परंतु पाच-सहा नगरसेवकांत निधी वाटून निवडणूक लढविता येत नाही. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, उपनगरांना निधी द्यायला ते विसरले आहेत. पालकमंत्री पाटील हे त्यांच्यासाठी कदमवाडी मतदारसंघ तयार करणार आहेत का? असा उपहासात्मक प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला.

 

Web Title: Kolhapur: Opposition to fund the municipal corporation;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.