कोल्हापूर :  करवीर, हातकणंगले तालुक्यातून भूसंपादनास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:22 PM2018-10-10T16:22:36+5:302018-10-10T16:24:25+5:30

रत्नागिरी ते नागपूर क्र. १६६ च्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध दर्शविला. या नव्या महामार्गासाठी जमीन मोजणीवेळी विरोध करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Kolhapur: Opposition to land acquisition from Karvir, Hatkanangale taluka | कोल्हापूर :  करवीर, हातकणंगले तालुक्यातून भूसंपादनास विरोध

कोल्हापूर :  करवीर, हातकणंगले तालुक्यातून भूसंपादनास विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देकरवीर, हातकणंगले तालुक्यातून भूसंपादनास विरोधरत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग : जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची बैठक

कोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर क्र. १६६ च्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध दर्शविला. या नव्या महामार्गासाठी जमीन मोजणीवेळी विरोध करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

रत्नागिरी ते नागपूर हा नवा राष्ट्रीय महामार्गचा सुमारे १५०० कोटी रुपयांचा प्रकल्प साकारत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले या तालुक्यातून हा मार्ग जात आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करवीर आणि हातकणंगले तालुक्यातून ग्रामस्थांची बैठक घेतली. हदगल यांनी, हा महामार्गाच्या भूसंपादनातील जमीनीचा मोबदलाबाबत सविस्तर चर्चा केली.

ग्रामस्थांनी, रत्नागिरीहून आलेला रस्ता हा बोरपाडळे येथून वारणा, शिये, वडगाव, चोकाकमागे असा रिंगरोड असताना या नव्या राष्ट्रीय  महामार्गाची गरजच काय? असा प्रश्न केला. तालुकयातील सहा गावातील १२ पाण्याच्या विहीरी, शेती रस्त्यात बाधीत होत असल्याचेही निदर्शनास आणले. या मार्गावरील जमीनींना भविष्यात मोठा दर येऊन त्या व्यवसायिक होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी हदगल यांनी पटवून दिले.

बैठकीस, उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल, राष्ट्रीय  महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक बी. एस. साळोखे, हातकणंगले तहसिलदार, तलाठी आदी महसूलमधील अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

भूसंपादनापूर्वी मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यावर ग्रामस्थ ठाम राहीले. त्यानंतर ग्रामस्थांनी सभागृहाबाहेर स्वतंत्र बैठक घेतली. यामध्ये हातकणंगले पंचायत समिती उपसभापती राजेश पाटील, वारणा सहकारी बँकेच संचालक सुभाष पुरंदरपाटील, अनिल पुजारी, रंगराव गायकवाड, अ‍ॅड. प्रशांत पाटील, धीरज पाटील, अ‍ॅड. सुनिल पाटील, विजय चौगुले यांनीही चर्चेत सहभाग नोंदवला.

रस्त्यासाठी किती जागा द्यायच्या?

कोल्हापूर ते सांगली रस्त्यासाठी आम्ही जमीनी दिल्या आहेत, आता या नव्या रस्त्यासाठी पुन्हा आम्ही जमीनी द्यायच्या. यातून मिळणारे पैसे ठेव ठेवून त्यावरच जगायचे का? आमच्या शेती सर्व या रस्त्यात जात असल्याने आजून किती जमीनी द्यायच्या? असाही प्रश्न काही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

मार्गासाठी भूसंपादन होणारी गावांची संख्या

१) शाहूवाडी तालुका-२५
२) पन्हाळा त ालुका -१०
३) करवीर तालुका- ८
४) हातकणंगले तालुका - ६
 

 

Web Title: Kolhapur: Opposition to land acquisition from Karvir, Hatkanangale taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.