कोल्हापूर : पेन्शनधारकांचा जुलैमध्ये मोर्चा, मतदान न करण्याचा निर्णय; चार संघटना एकत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:00 PM2018-06-20T13:00:31+5:302018-06-20T13:00:31+5:30

‘ईपीएस ९५’ पेन्शनधारकांना जोपर्यंत पेन्शनवाढ मिळत नाही, तोपर्यंत सत्ताधारी पक्षाला देशातील पेन्शनधारक मतदान करणार नाहीत, असा निर्णय सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी संघटना, आदींच्या पुणे येथे झालेल्या राज्यपातळीवरील बैठकीत घेण्यात आला.

Kolhapur: Opposition to vote in July, pensioners decide not to vote; Four organizations gathered | कोल्हापूर : पेन्शनधारकांचा जुलैमध्ये मोर्चा, मतदान न करण्याचा निर्णय; चार संघटना एकत्रित

कोल्हापूर : पेन्शनधारकांचा जुलैमध्ये मोर्चा, मतदान न करण्याचा निर्णय; चार संघटना एकत्रित

Next
ठळक मुद्देकोल्हापूर : पेन्शनधारकांचा जुलैमध्ये मोर्चामतदान न करण्याचा निर्णय

कोल्हापूर : ‘ईपीएस ९५’ पेन्शनधारकांना जोपर्यंत पेन्शनवाढ मिळत नाही, तोपर्यंत सत्ताधारी पक्षाला देशातील पेन्शनधारक मतदान करणार नाहीत, असा निर्णय सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी संघटना, आदींच्या पुणे येथे झालेल्या राज्यपातळीवरील बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सर्व श्रमिक महासंघाचे सरचिटणीस उदय भट होते. एकजुटीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी देशातील चार संघटना एकत्रित आल्या आहेत. त्या संघटनामार्फत ५ जुलैला प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहेत. त्यावेळी खासदारांना मोर्चाला सामोरे जाण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीमध्ये २३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. चार संघटनांनी एकत्रित मिळून देशातील पेन्शनबाबत कामकाज चालविण्यासाठी अतुल दिघे, सुभाष कुलकर्णी, प्रकाश येंदे, रमेश गवळी यांचे अध्यक्षीय मंडळ नेमण्यात आले. यावेळी अनंत कुलकर्णी, अप्पासाहेब बिडकर, श्रीकांत माने, गोपाळ पाटील, नाना जगताप, आदी उपस्थित होते, अशी माहिती सर्व श्रमिक संघाचे सचिव अनंत कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली.

 

Web Title: Kolhapur: Opposition to vote in July, pensioners decide not to vote; Four organizations gathered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.