कोल्हापुरात झाला पी ढबाकचा गजर, त्र्यंबोली यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:01 PM2018-08-03T18:01:31+5:302018-08-03T18:05:03+5:30

फुलांच्या माळांनी सजलेल्या कळशी डोक्यावर घेतलेल्या कुमारिका-सुवासिनी , पी ढबाकचा गजर आणि अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी कोल्हापुरात त्र्यंबोली देवीची यात्रा संपन्न झाली.

In Kolhapur, the P. Dhabak alarata, Trimboli travel excitement | कोल्हापुरात झाला पी ढबाकचा गजर, त्र्यंबोली यात्रा उत्साहात

कोल्हापुरात झाला पी ढबाकचा गजर, त्र्यंबोली यात्रा उत्साहात

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात झाला पी ढबाकचा गजर, त्र्यंबोली यात्रा उत्साहातनदीला आलेल्या नव्या पाण्याची आषाढी जत्रा

कोल्हापूर : फुलांच्या माळांनी सजलेल्या कळशी डोक्यावर घेतलेल्या कुमारिका-सुवासिनी , पी ढबाकचा गजर आणि अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी कोल्हापुरात त्र्यंबोली देवीची यात्रा संपन्न झाली.

यानिमित्त देवीचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. दर शहरातील विविध भागातून निघालेल्या मिरवणूकांनी यात्रेत रंग भरले.



पंचगंगा नदीला आलेल्या नव्या पाण्याची आषाढी जत्रा करण्याची प्रथा कोल्हापुरात आहे. सजवलेल्या कळशीत हे पाणी घेवून महिला-मुलींसह भागाभागातील नागरिक पी ढबाक या पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून देवीला पाणी वाहतात. कित्येक वषार्पासून जोपासली जात आहे. शहरातील पेठा, तरुण मंडळे, उपनगरातील भाविक सामुदायिकपणे लोकवर्गणी काढून या नव्या पाण्याच्या जत्रांचे आयोजन करतात.

यंदा १२ आॅगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. आषाढातील शेवटच्या मंगळवारी (दि. ७ आॅगस्ट) एकादशी व शुक्रवारी (दि. १०) अमावास्या आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शहरातील भाविकांनी शुक्रवारी आपल्या जत्रा पूर्ण केल्या. सकाळपासूनच पेठापेठांमधील भाविक फुलांनी सजवलेल्या पाण्याचे कलश (घागरी) डोक्यावर घेऊन वाजतगाजत नदीवरून त्र्यंबोली टेकडीच्या दिशेने जात होते.

महिला, लहान मुलींनी डोक्यावर कलश घेतले होते. तरुण मुलांकडून गुलालाची उधळण केली जात होती. पारंपरिक वाद्य पी. ढबाकच्या तालावर सर्वजण त्र्यंबोलीच्या दर्शनाला जात होते. त्यामुळे संपूर्ण शहर यात्रामय झाले होते. शुक्रवारी शहरातील शिवाजी पेठ, हनुमान तालीम, मंगळवार पेठ, रविवार पेठ, रंकाळा परिसर, खंडोबा तालीम, गंगावेस, शुक्रवार पेठ, कदमवाडी, कसबा बावडा, लाईन बाजार या परिसरातील यात्रा उत्साहात पार पडल्या.

पोलीस मुख्यालयाची पालखी...

पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी अक्षय व्हरांबळे यांच्या घरातून पालखीला सुरवात झाली. तेथून त्र्यंबोली मंदिरात आरती झाल्यानंतर पोलिसांच्यावतीने पालखीला मानवंदना देण्यात आली. पोलीस वसाहतीत फिरून पालखी पुढे ड्रील शेडमध्ये आल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांच्या पत्नी, तसेच गृह पोलीस उपअधिक्षक सतीश माने यांच्या पत्नी व तत्कालीन पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे यांच्या पत्नी अनुराधा देशपांडे यांनी देवीची ओटी भरली.

 

Web Title: In Kolhapur, the P. Dhabak alarata, Trimboli travel excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.