कोल्हापूर : पंचायती राज समितीने घेतली जिल्हभर झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 06:42 PM2018-09-06T18:42:08+5:302018-09-06T18:47:07+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील संवर्ग एकमधील अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्ह्याच्या विकासावर विपरित परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पंचायत राज समितीने गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थेतील कामकाजाबद्दलच्या समस्यांचा आढावा घेतला.

Kolhapur: Panchayati Raj Samiti took up the whole of Jharkhand district | कोल्हापूर : पंचायती राज समितीने घेतली जिल्हभर झाडाझडती

कोल्हापूर : पंचायती राज समितीने घेतली जिल्हभर झाडाझडती

Next
ठळक मुद्दे पंचायती राज समितीने घेतली जिल्हभर झाडाझडतीकामकाजासह, समस्यांचा घेतला आढावा, आमदारांनी मांडल्या त्रुटी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील संवर्ग एकमधील अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्ह्याच्या विकासावर विपरित परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पंचायत राज समितीने गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थेतील कामकाजाबद्दलच्या समस्यांचा आढावा घेतला.


भुदरगड तालुक्यात अवघी पंधरा मिनिटे देखील समिती थांबली नाही. मात्र या समितीने हातकणंगलेमध्ये झाडाझडती घेवून अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. यावेळी सरपंच, पंचायत समिती सदस्यांनी विकासकामात येणाºया तक्रारीचा पाढा वाचला. शिरोळमध्ये आमदार उल्हास पाटील यांनी विकासकामाबाबत तक्रारी मांडल्या.

आजºयात समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना काही बाबतीत धारेवर धरले, तर भुदरगड तालुक्यात मात्र पंचायत राज समितीने केवळ चौकशीचा फार्स केला. चंदगड मध्ये सायंकाळी दाखल झालेल्या या कमिटीचे जोरदार स्वागत केले.



समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांच्याशी स्थानिक स्वराज संस्थेतील दैनंदिन कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत अनेक तालुक्यतील पदाधिकाऱ्यां नी चर्चा केली. अनेक ठिकाणी प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

याशिवाय वैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, तसेच अनेक ठिकाणी वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे विविध योजना राबविण्यात आलेल्या नसल्याचे या समितीच्या लक्षात आणून देण्यात आले.

Web Title: Kolhapur: Panchayati Raj Samiti took up the whole of Jharkhand district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.