कोल्हापूर :  ‘पर्यावरण अभ्यास’चा पेपर लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 07:13 PM2018-04-24T19:13:35+5:302018-04-24T19:13:35+5:30

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ पदाची परीक्षा दि. १३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे या दिवशी शिवाजी विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल या द्वितीय सत्रात होणारा ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. हा पेपर दि. २० मे रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होणार आहे.

Kolhapur: Paper for 'Environmental Studies' postponed | कोल्हापूर :  ‘पर्यावरण अभ्यास’चा पेपर लांबणीवर

कोल्हापूर :  ‘पर्यावरण अभ्यास’चा पेपर लांबणीवर

Next
ठळक मुद्दे  ‘पर्यावरण अभ्यास’चा पेपर लांबणीवरअराजपत्रित गट ‘ब’ पदाच्या परीक्षेमुळे पेपर पुढे ढकलला

कोल्हापूर : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ पदाची परीक्षा दि. १३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे या दिवशी शिवाजी विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल या द्वितीय सत्रात होणारा ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. हा पेपर दि. २० मे रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होणार आहे.


बी. एस्सी., बी. एस्सी. (बायोटेक, शुगर, आय. टी., अ‍ॅनिमेशन, फॉरेन्सिक सायन्स, फूड प्रोसेसिंग, नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी, बी. सी. ए., बी. बी. ए., लॉ, बी. टेक., बी. आय. डी., बी. एफ. टी. एम., बी. डेस.), आदी अभ्यासक्रमांसाठी ‘पर्यावरण अभ्यास’ हा आवश्यक विषय आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा पेपर दि. १३ मे रोजी होणार होता. मात्र, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ पदाच्या परीक्षेमुळे हा पेपर पुढे ढकलला आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
 

 

Web Title: Kolhapur: Paper for 'Environmental Studies' postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.