कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शनरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:51 PM2018-07-05T13:51:35+5:302018-07-05T13:59:02+5:30
सेवानिवृत्त कामगारांना तत्काळ पेन्शन लागू करावी, पेन्शनवाढीसाठी नेमलेल्या खासदार भगतसिंह खोशियारी समितीचा अहवाल लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त पेन्शनर संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर : सेवानिवृत्त कामगारांना तत्काळ पेन्शन लागू करावी, पेन्शनवाढीसाठी नेमलेल्या खासदार भगतसिंह खोशियारी समितीचा अहवाल लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त पेन्शनर संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त पेन्शनर सहभागी झाले होते. मोर्चानंतर जिल्ह्यातील खासदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पेन्शनर संघटनेचे स्वतंत्र दोन मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले, मागणी मात्र एकच होती. यामुळे पोलिसांची मात्र धावपळ उडाली.
दुपारी १२ वाजता दसरा चौकातून निघालेल्या या मोर्च्याचे नेतृत्व जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष शामराव मोरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटना कृती समितीच्या पुणे येथील बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच दिवशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्या अनुषंगाने कोल्हापुरातही मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त पेन्शनर सहभागी झाले. मोर्चानंतर जिल्ह्यातील खासदारांना निवेदन देण्यात आले.