कोल्हापूर : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाज तरुणांवर दंडात्मक कारवाई, पोलिसांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 07:53 PM2018-03-06T19:53:14+5:302018-03-06T20:04:18+5:30

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोटारसायकलवरून कर्कश आवाज करीत हुल्लडबाजी करणाऱ्या १५० पेक्षा जास्त तरुण-तरुणींवर पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. सुमारे ३० हजार रुपये दंड वसूल केला, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

Kolhapur: Police action against rowdy youths, police campaign in the backdrop of Rangapanchami | कोल्हापूर : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाज तरुणांवर दंडात्मक कारवाई, पोलिसांची मोहीम

कोल्हापूर शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. (छाया : दीपक जाधव)

Next
ठळक मुद्देहुल्लडबाज तरुणांवर दंडात्मक कारवाईरंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोहीम

कोल्हापूर : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोटारसायकलवरून कर्कश आवाज करीत हुल्लडबाजी करणाऱ्या १५० पेक्षा जास्त तरुण-तरुणींवर पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. सुमारे ३० हजार रुपये दंड वसूल केला, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.


लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेले हुल्लडबाज तरुण. (छाया : दीपक जाधव)

रंगपंचमीनिमित्त तरुण-तरुणी बेभान होऊन मंगळवारी सकाळपासून मोटारसायकलवरून धूम स्टाईलने शहरात फेरफटका मारीत होते. एकमेकांच्या अंगावर रंग मारीत जल्लोष करीत होते. काही तरुण-तरुणी ट्रिपल सीट मोटारसायकलवरून कर्कश हॉर्न मोठ्याने वाजवीत फिरताना पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

काहीजण मद्यप्राशन करून वाहन चालवितानाही आढळून आले. राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिसांनी आपापल्या हद्दींनुसार चौका-चौकांत नाकेबंदी करून ही कारवाई केली.

शहर वाहतूक शाखेनेही स्वतंत्रपणे वाहनचालकांवर कारवाई केली. दुपारी बारापासून ही कारवाई सुरू होती. पोलीस रस्त्यांवर पाहून काही तरुण-तरुणींनी आखलेले प्लॅन रद्द करीत कारवाईच्या भीतीने घरीच बसून राहणे पसंत केले.

 

 

Web Title: Kolhapur: Police action against rowdy youths, police campaign in the backdrop of Rangapanchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.