कोल्हापूर : पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालये झाली ‘आयएसओ स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:25 AM2018-05-03T11:25:08+5:302018-05-03T11:25:08+5:30
कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक या दोन्ही कार्यालयांना ‘आयएसओ स्मार्ट’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पोलीस दलास करण्यात आले.
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक या दोन्ही कार्यालयांना ‘आयएसओ स्मार्ट’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पोलीस दलास करण्यात आले.
कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना ‘आयएसओ स्मार्ट’ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, आदी उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव)
कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना ‘आयएसओ स्मार्ट मानांकन’ प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री पाटील यांनी ‘झिरो पेंडन्सी’अंतर्गत या कार्यालयाने केलेल्या कामाचे कौतुक करून रेकॉर्ड रूमची पाहणी केली.
पोलीस अधीक्षक कार्यालयासह चार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि १० पोलीस स्टेशन्सना ‘आयएसओ स्मार्ट मानांकन’ मिळाले आहे. त्याचे प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात मंत्री पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी मंत्री पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.