कोल्हापूर पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 11:03 AM2021-02-09T11:03:59+5:302021-02-09T11:07:34+5:30
Corona vaccine Police Kolhapur- फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या कोल्हापूर पोलिसांना सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडेंसह काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
कोल्हापूर : फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या कोल्हापूरपोलिसांना सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडेंसह काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून पोलिसांनीही सेवा बजावली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपाठोपाठ आता सोमवारपासून कोल्हापूर पोलिसांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. शहरातील लाईन बाजार सेवा रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटलसह जिल्ह्यात एकूण आठ आरोग्य केंद्रांत ही लस देण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, आदी आधिकाऱ्यांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. पुढे सर्वच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.