Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:36 AM2022-04-19T11:36:41+5:302022-04-19T11:38:00+5:30

अँड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे.

Kolhapur police team arrives in Mumbai for arrest of Gunaratna Sadavarte | Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल

Next

कोल्हापूर : अँड. गुणरत्न सदावर्ते याच्या अटकेसाठी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलिसांचे विशेष पथक आज, मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. तेथे न्यायालयाच्या आदेशानंतर दुपारी सदावर्तेच्या ताबा घेऊन अटक करण्यात येणार आहे. रात्रीपर्यंत त्यांना कोल्हापूरला आणण्यात येणार आहे.

सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरातील समन्वयक दिलीप पाटील यांनी अँड. गुणरत्न सदावर्ते याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अँड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्या तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंनी प्रयत्न केला असल्याचेही दिलीप पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

अँड. सदावर्तेला आठवड्यापूर्वी सातारा पोलिसांनी अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडीत दिली. सायंकाळी त्यास मुंबईत कारागृहात हलवण्यात आले होते. त्याचा ताब्यात घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे विशेष पथक काल, सोमवारी रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले.

Web Title: Kolhapur police team arrives in Mumbai for arrest of Gunaratna Sadavarte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.