कोल्हापूर : ही ‘राजकीय खेळी’ की ‘फिव्हर ’, खेळाडूंसह संघावर बक्षिसांची लयलुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:04 PM2018-05-04T13:04:11+5:302018-05-04T13:04:11+5:30

वाढत्या उन्हाबरोबर अवघ्या सहा आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ‘फिव्हर’ आतापासूनच फुटबॉल रसिकांवर चढू लागला आहे. त्यात ‘फुटबॉलची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धा घेण्याची जणू चुरसच निर्माण झाली आहे. त्यात फुटबॉल प्रेम किती अन् निवडणुकीची तयारी किती हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या स्पर्धा म्हणजेच करवीरकरांचा चर्चेचा विषय ठरला नाही तर नवलच म्हणावे लागेल.

Kolhapur: This is the 'political knife' or 'fiver', with the players, the prizes for the team | कोल्हापूर : ही ‘राजकीय खेळी’ की ‘फिव्हर ’, खेळाडूंसह संघावर बक्षिसांची लयलुट

कोल्हापूर : ही ‘राजकीय खेळी’ की ‘फिव्हर ’, खेळाडूंसह संघावर बक्षिसांची लयलुट

Next
ठळक मुद्देही ‘राजकीय खेळी’ की ‘फिव्हर ’खेळाडूंसह संघावर बक्षिसांची लयलुटदिड महिन्यांवर येवून ठेपला फुटबॉल विश्वचषक

सचिन भोसले

कोल्हापूर : वाढत्या उन्हाबरोबर अवघ्या सहा आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ‘फिव्हर’ आतापासूनच फुटबॉल रसिकांवर चढू लागला आहे. त्यात ‘फुटबॉलची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धा घेण्याची जणू चुरसच निर्माण झाली आहे. त्यात फुटबॉल प्रेम किती अन् निवडणुकीची तयारी किती हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या स्पर्धा म्हणजेच करवीरकरांचा चर्चेचा विषय ठरला नाही तर नवलच म्हणावे लागेल.

यंदाच्या हंगामात भरघोस स्पर्धांमुळे खेळाडूंसह संघांचेही भले झाले आहे. त्यात के.एस.ए. तर्फे के.एस.ए चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत विजेत्यास ७५ हजार, तर उपविजेत्या संघास ३० हजार व अन्य बक्षिसे देण्यात आली. तर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजेश चषक’ स्पर्धेत विजेत्या संघास दीड लाख, तर उपविजेत्या संघास ७५ हजार व अन्य बक्षिसांची लयलूट करण्यात आली.

त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची स्पर्धा म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष व भाजपचे उत्तर विधानसभेचे दावेदार महेश जाधव यांच्या पुढाकारातून ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा भरविण्यात आली. त्यात एकूण १५ लाख रुपये खर्च स्पर्धेसाठी करण्यात आला. त्यात विजेत्या संघास प्रथमच ५ लाख , तर उपविजेत्या संघास अडीच लाख व तिसºया व चौथ्या क्रमांकास प्रत्येकी ५० हजार व सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी ५० हजारांचे सोन्याचे दागिने देण्यात आले. यासह आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव यास मोटारसायकल भेट देण्यात आली.

त्यानंतर ‘महापौर चषक फुटबॉल’ स्पर्धेतील विजेत्या संघास १ लाख, तर उपविजेत्या संघास ७५ हजार आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही बक्षीस असे स्वरुप होते. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील गु्रपतर्फे ‘सतेज चषक फुटबॉल’ स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या संघास १ लाख ५१ हजार व उपविजेत्या संघास ७५ हजार यासह वैयक्तिक बक्षिसाची लयलुट केली जाणार आहे. यासह महासंग्राम फुटबॉल स्पर्धाही होणार आहेत. मात्र, याचे बक्षिस अद्यापही जाहीर झालेले नाही.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खेळाडू व संघांनाही मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा संयोजनावरच कोट्यावधीचा खर्च झाला आहे. त्यामुळे संघांसह खेळाडूही खूश आहेत.

यात दुग्धशर्करा योग म्हणून १४ जूनपासून रशिया येथे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. स्पर्धेची सुरुवात रशिया व सौदी अरेबिया यांच्यातील सामन्याने होणार आहे. त्यामुळे अवघ्या सहा आठवड्यांवर विश्वचषकही येऊन ठेपला आहे. त्यामुळे यात फुटबॉल प्रेम किती अन सन २०१९ म्हणजे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांची तयारी किती हा संशोधनाचा व नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

यंदाच्या हंगामातील बक्षिसे

स्पर्धा                                 बक्षिसांची रक्कम
के.एस.ए वरिष्ठ लीग            १,५०,०००
राजेश चषक                         ३,०००,००
अटल चषक                          १५,०००,००
महापौर चषक                      २,२५,०००
सतेज चषक                         २,५०,०००

मागील हंगामातील बक्षिसांची रक्कम 

के.एस.ए. वरिष्ठ लीग           - १,५०,०००
नेताजी चषक फुटबॉल            - १,२५,०००
महासंग्राम फुटबॉल चषक       -१,५०,०००
 

 

Web Title: Kolhapur: This is the 'political knife' or 'fiver', with the players, the prizes for the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.