कोल्हापूर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत उदगांवात रंगला मुकुट खेळ, बाराशे वर्षाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:37 PM2018-05-16T15:37:48+5:302018-05-16T16:14:17+5:30
हलगिचा ठेका, कैताळाचा आवाज, तुतांरीचा शिनगांर साथीने उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक बाराशे वर्षापासुन असलेली मुकुट खेळाविण्याचे परंपरा हजारो भाविकांनी अनुभवली. मुकुटला खिजवून पळत असलेला संवगडी त्याच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा रंगलेला खेळ भाविकांनी डोळयात टिपला. मुकुट पाहण्यासाठी मोठी गदी झाल्याने, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जयसिंगपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
संतोष बामणे
उदगांव (जि.कोल्हापूर) : हलगिचा ठेका, कैताळाचा आवाज, तुतांरीचा शिनगांर साथीने उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक बाराशे वर्षापासुन असलेली मुकुट खेळाविण्याचे परंपरा हजारो भाविकांनी अनुभवली. मुकुटला खिजवून पळत असलेला संवगडी त्याच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा रंगलेला खेळ भाविकांनी डोळयात टिपला. मुकुट पाहण्यासाठी मोठी गदी झाल्याने, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जयसिंगपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी बुधवारी सकाळी सहा वाजता ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मंदिरातुन मानाच्या असलेल्या मुकुटे बाहेर काढण्यात आली. यावेळी मुकुट धरण्याचा मान झ्र सुरज आंबी, गुंडू कोळी, कुबेर सुतार, सतीश कुंभार यांना मिळाला. यात एक नर व दोन मादीचे मुकुट व एक सूपाचा सहभाग होता.
प्रथम जागेश्वरी मंदिर ते परीटाच्या कमानीपर्यत मुकुट खेळविण्यात आले. यामध्ये डोक्यावर मुकुट, हातात वेताची काठी व पाठीमागून धरणारा व्यक्ती असतो. यावेळी मुकुटाला खिजवून पळणा-या अनेक सवंगडयानी मुकुट धा-यांचा हातातील वेताच्या काठीचा मार झेलला.
अशा प्रकारे अनेक तरुण, शालेय मुले, तसेच अनेक भाविकांनी मुकुटाला खिजवून मुकुट खेळ खेळून उत्साह वाढविला. एखादया संवगडयाने मार खाल्यानंतर गर्दीतुन टाळा व शिटटयासह उत्साह वाढत होता. तर मुकुट खेळ ग्रामपंचायत व गावचावडी, गणपती मंदिर असा प्रकारे महादेवी मंदिरापर्यत खेळविला जाते.
दरम्यान, गणपती व महादेवी मंदिराजवळ मुकुट आल्यावर मोठया प्रमाणात हजारोच्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती. त्यांनतर मारुती मंदिराजवळ मुकुट आल्यानंतर अनेक खेळ खेळविण्यात आले. त्यांनतर बाराच्या सुमारास मुकुटांकडून नारळ देण्यात आला.
मुकुटासमोर जाऊन तरूणांनी मुकुटांची काठी न खाता नारळ उचलल्यानंतर मुकुटाचा विविध धार्मिक मानपान करुन मुकुट खेळाची सांगता करण्यात आली. त्यांनतर मुकुटे जोगणी मंदिरात नेण्यात आली. यावेळी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रं पाटील-यड्रावकर यांनी भेट दिली. तर उदगांव ग्रामपंचायत व यात्रा कमिटीकडुन चांगले नियोजन करण्यात आले आहे.
बारा बलूतेदारांना मिळाला मान
उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेत मादनाईक देसाई दिव्यांना नाव दिले, मानकरी पाटील- वाटी धरली. माने सरकार जोगणीचे संरक्षक तलवार धरली. मगदुम नारळ फोडणे. कुंभार जोगण्या तर न्हवी- जोग्या. आंबी-सुतार-कोळी-चांभार-महार-मांग- पिशे, परीट- जोधळयाचा चौक, मांग तोरण बांधणे, चांभार-दिवटी धरणे, महार- थळयातील पुजा असा प्रकारे बारा बलूतेदारांना मान मिळाला.