कोल्हापूर :गंजीमाळ मध्ये घरात जुगार अड्डयावर छापा ; १५ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:21 PM2018-08-28T16:21:17+5:302018-08-28T16:23:10+5:30

टिंबर मार्केट गंजीमाळ येथे घरात तीन पानी पत्ते जुगार खेळणाऱ्यांसह घरमालकाला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री उशिरा छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Kolhapur: Printed on gambling house in Ganjamala house; 15 arrested | कोल्हापूर :गंजीमाळ मध्ये घरात जुगार अड्डयावर छापा ; १५ अटक

कोल्हापूरातील टिंबर मार्केट गंजीमाळ येथे एका घरात तीन पानी पत्तेचा जुुगार खेळणाºया सोमवारी (दि. २७) रात्री जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून १५ जणांना अटक केली. त्यांना पोलिस ठाण्यात आणले. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देगंजीमाळ मध्ये घरात जुगार अड्डयावर छापा ; १५ अटक२३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : टिंबर मार्केट गंजीमाळ येथे घरात तीन पानी पत्ते जुगार खेळणाऱ्यांसह घरमालकाला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री उशिरा छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी संशयित घरमालक प्रल्हाद म्हादू कांबळे (वय ५२, रा. ७१३ ए वॉर्ड, गंजी गल्ली, टिंबर मार्केट) , संदेश दिनकर कांबळे (वय ४८, रा. रेणूकानगर, पाचगांव), राजू पांडूरंग करपे ( ५१) , धीरज अनिल भाटे (३७) , राजेंद्र शामराव कांबळे (३५), राकेश दगडू कांबळे (३३), संग्राम नंदकुमार जरग (३०), नामदेव बबन भाले ( ५४) , प्रविण मच्छिंद्र पाथरुट ( ३५) , विशाल संतराम कांबळे (४० ) , अमित संभाजी टिपुगडे ( २८), सोमेश सुहास साठे (२५ , सर्व रा.ए वॉर्ड, गंजी गल्ली, टिंबर मार्केट कोल्हापूर), कपिल सुरेंद्र चव्हाण (३०,रा. वारे वसाहत, कोल्हापूर) , सागर दीपक भोसले ( ३२, रा. राजाराम चौक , टिंबर मार्केट), कृष्णात गणपती सोरटे ( ४५, रा. आरे , ता. करवीर) यांना अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एकनाथ चौगले, प्रितम मिठारी, सचिन देसाई, संदीप बेंद्रे , नितीन कुराडे, शाहू तळेकर यांनी केली.
 

 

Web Title: Kolhapur: Printed on gambling house in Ganjamala house; 15 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.