कोल्हापूर : बाबूजमाल येथील गलेफ मिरवणूक उत्साहात, घोड्यांचा लवाजमा, सर्वधर्मियांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:57 PM2018-06-13T17:57:12+5:302018-06-13T17:57:12+5:30
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
येथील बाबूजमाल दर्गाह येथे दरवर्षी हा ऊरूस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. या अंतर्गंत गलेफ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फकिरांचा रतिक खेळ झाल्यानंतर ढोल-ताशांचा गजरात रात्री सवाद्य वाजत गलेफ मिरवणूक काढण्यात आली.
कोल्हापुरातील येथील हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. (छाया : दीपक जाधव)
दर्ग्यांमध्ये फतिहा पठण झाल्यानंतर पारंपरिक वाद्ये, सजवलेल्या घोड्यांच्या लवाजम्यासह आतषबाजी मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक येथील गावकामगार पाटील यांच्या घराला भेट देऊन गुजरी, जुना राजवाडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या गादीच्या ठिकाणी फतिहा पठण झाले. त्यानंतर शिवाजी चौकातील घुडणपीर दर्गापासून पापाची तिकटीमार्गे बाबूजमाल दर्गाह येथे रात्री उशिरा आली. तेथे नाल सलाम करून फतिहा पठण करण्यात आले. याठिकाणी गलेफ चढविण्यात आला.
यावेळी दर्ग्यांचे मुख्य खादिम लियाकत मुजावर, एैनुद्दीन मुल्ला, अल्ताफ मुतवल्ली, शकील मुतवल्ली, इम्तियाज मुतवल्ली, दिलावर मुजावर, शाहरूख गडवाले यांच्यासह हिंदूधर्मिय मोठ्या संख्येन उपस्थित होते. दर्शनासाठी दर्गा बुधवारी पहाटेपर्यंत खुला होता.