कोल्हापूर : विद्यार्थी पटसंख्या वाढसाठी जनजागृती रॅली, महापालिकेच्या शिक्षण मंडळ समितीतर्फे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:16 PM2018-06-12T16:16:18+5:302018-06-12T16:16:18+5:30
कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, नागरिकांचा महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदी प्रचार व प्रसारासाठी जनजागृती दूचाकी रॅली मंगळवारी दसरा चौकातून काढण्यात आली.
कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, नागरिकांचा महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदी प्रचार व प्रसारासाठी जनजागृती दूचाकी रॅली मंगळवारी दसरा चौकातून काढण्यात आली.
महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीचे उदघाटन झाले. यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, शिक्षण समिती सभापती वनिता देठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राथमिक शिक्षण समितीच्या ५९ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ९६५१ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. सन २०१८-१९ मध्ये गुढीपाडव्या दिवशी १०२१ विद्यार्थ्यांची नोंदणी महापालिकेच्या शाळेत झाली आहे.
महापालिका शाळेतील वैशिष्ट्यांचा प्रचार व प्रसार होणे, शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा कामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासमवेत दुचाकीवरुन या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जवाहरनगर, राजोपाद्येनगर, फुलेवाडी, बावडा व टेंबलाईवाडी या पाच विभागातून शाळा परिसरात रॅली काढणेत आली. यानंतर या विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी दुचाकीवरुन मुख्य रॅलीसाठी दसरा चौक येथे एकत्रित आले होते.
रॅलीत सभागृह नेता दिलीप पोवार , नगरसेविका शोभा कवाळे, अॅड. सूरमंजिरी लाटकर, नगरसेवक अशोक जाधव, प्रभारी प्रशासन अधिकारी एस. के. यादव , रसुल पाटील , बाबा साळोखे , विजय माळी, बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई, सचिन पांडव यांच्यासह संदिप उबाळे, जगदिश ठोंबरे, सुर्यकांत ढाले, अजय गोसावी, संजय शिंदे, निलेश सरनाईक, नचिकेत सरनाईक, शांताराम सुतार आदींचा सहभाग होता. दसरा चौक येथून अयोध्या टॉकीज, बिंदू चौक, शिवाजी रोड , शिवाजी पुतळा,सीपीआर चौक मार्गे दसरा चौकात रॅलीचा समारोप झाला.
पथनाट्य...
महापालिकेच्या शाळांप्रश्नी प्रभाकर लोखंडे, विठ्ठल देवणे, तानाजी दराडे, साताप्पा पाटील, प्रकाश गावडे, विजय सुतार, सरिता सुतार, सरिता कांबळे, वंदिता लव्हटे, समिधा चौगुले यांचा सहभाग होता.