कोल्हापूर : महापालिका अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका : सुनील केंबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:51 PM2018-06-18T17:51:43+5:302018-06-18T17:51:43+5:30
कोल्हापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
केंबळे म्हणाले, शहर व उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. या भटक्या कुत्र्यांचे कळप चौक आणि गल्लीबोळात मोठ्या संख्येने फिरताना दिसत आहेत. ६ जूनला पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले.
नागरी क्षेत्रामध्ये गुरे, पाळीव प्राणी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची आहे, परंतु या घटनेवेळी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली. त्यामुळे कुत्र्यांच्या चाव्यामुळे निष्पाप नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना नाहक शारीरिक, मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागला. संबंधितांना महापालिकेने रोख २५ हजार व औषधोपचाराचा खर्च त्वरित द्यावा.